Virat Kohli Ind Vs Nz : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना उद्या दुबईमध्ये खेळला जाणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड या महामुकाबल्यामध्ये भारताचे पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे. उद्याच्या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला नवा विक्रम करण्याची मोठी संधी आहे. जर त्याने अंतिम सामन्यामध्ये ४६ धावा केल्या, तर विराट इतिहास रचेल.
ख्रिस गेलच्या नावावर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावा या विक्रमाची नोंद आहे. तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये १७ सामने खेळला आहे. त्याने तीन शतकं आणि एका अर्धशतकाच्या मदतीने ७९१ धावा केल्या आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात फक्त ४६ धावा केल्यास विराट कोहली ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडेल. याशिवाय विराट कोहली हा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज बनेल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये विराटने शिखर धवनचा ७०१ धावांचा विक्रम मोडला होता. तो चॅम्पियन्स ट्रॉफीमधला भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. विराटला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज हा विक्रम करण्याची देखील संधी आहे. सध्या सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने ४ सामन्यांमध्ये २१७ धावा केल्या आहेत.
विराट कोहली टीम इंडियासाठी ३०१ वनडे सामने खेळला आहे. या सामन्यांमध्ये त्याने १४,१८० धावा केल्या आहेत. जर अंतिम सामन्यात त्याने ५५ धावांचा टप्पा पार केला. तर विराट कोहली वनडे सामन्यांध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर जाईल. या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. सचिनने वनडेमध्ये सर्वाधिक १८,४२६ धावा केल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.