Arshdeep Singh and Daryl Mitchell had an on-field argument during the T20 final at the Narendra Modi Stadium in Ahmedabad 
Sports

IND vs NZ Final: ऐनरंगात आलेल्या सामन्यात अर्शदीप सिंग आणि डॅरिल मिशेलमध्ये बाचाबाची; सूर्यदादाला करावी लागली मध्यस्थी|VIDEO

Arshdeep–Mitchell Argument: अहमदाबाद स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात अर्शदीप सिंग आणि डॅरिल मिशेल यांच्यात वाद झाला.

Bharat Jadhav

  • टी-२० वर्ल्ड कप २०२६ फायनलमध्ये अर्शदीप सिंग आणि डॅरिल मिशेल यांच्यात वाद झाला.

  • हा प्रकार न्यूझीलंडच्या डावाच्या ११ व्या षटकात घडला.

  • अर्शदीपने मिशेलच्या दिशेने चेंडू फेकल्यामुळे वाद वाढला.

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत ५ गडी गमावून २५५ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. त्यांचा निम्मा संघ ७२ धावांवर परतला होता.

न्यूझीलंडच्या डावाच्या ११ व्या षटकात भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि डॅरिल मिशेल यांच्यात वाद झाला. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. क्षेत्ररक्षण करताना अर्शदीप सिंगने अचानक मिशेलकडे चेंडू थेट फेकला होता. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला.

अर्शदीप सिंगला डावाच्या ११ व्या षटकाची जबाबदारी देण्यात आली. मिशेल सँटनरने पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. तर डॅरिल मिशेलने अर्शदीपच्या दोन चेंडूंवर दोन षटकार मारले. चौथा चेंडू वाईड होता, त्यानंतर अर्शदीप सिंगच्या चौथ्या चेंडूवर मिशेलने एक्स्ट्रा कव्हरकडे खेळला पण त्याला धाव काढता आली नाही. पाचव्या चेंडूवर मिशेलने ऑफ स्टंपच्या बाहेर मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट अर्शदीप सिंगकडे गेला.

. त्यानंतर त्याने थ्रो मिशेलकडे फेकला. त्यानंतर संतापलेल्या मिचेलने अर्शदीप सिंगशी वाद घातला. मिशेलचा राग पाहून टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला दोघांमध्ये हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर मैदानावरील पंच अर्शदीप सिंगशी बोलले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राळेगाव तालुक्यात आदिवासी समाजातील 34 मुली गायब; भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांचा गंभीर आरोप

Iran vs US War: कोणतीच तारीख निश्चित नाही, अमेरिका अविश्वासघातकी; चर्चेच्या दुसऱ्या फेरीदरम्यान इराणचं मोठं विधान

Aamba Kalakand Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी झटपट बनवा टेस्टी आंबा कलाकंद रेसिपी, वाचा सोपी रेसिपी

EPFO KYC Update: KYC शिवाय PFचे पैसे मिळणार नाहीत, वाचा ऑनलाइन प्रोसेस

Crime News: दहा वर्षांचं प्रेम, मुलीचा मात्र लग्नाला नकार; अलिबागमध्ये तरूणाची आत्महत्या, मृतदेहाजवळ फोटो सापडल्याने खळबळ

SCROLL FOR NEXT