virat kohli twitter
Sports

Virat Kohli Run Out: काय गरज होती? शेवटचे १० मिनिटं शिल्लक असताना, विराट रनआऊट- VIDEO

India vs New Zealand 3rd Test, Virat Kohli Runout: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीत विराट कोहली स्वस्तात माघारी परतला आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli Run Out In 3rd Test: विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आपल्या कारकिर्दीतील ६०० वी इनिंग खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील २०० वी इनिंग होती. या इनिंगमध्ये त्याला धावबाद होऊन माघारी परतावं लागलं आहे.

आउट ऑफ फॉर्म असलेल्या विराटला या सामन्यातही सुर गवसला नव्हता. तो ६ चेंडूत ४ धावा करत तंबूत परतला. पहिल्या दिवसातील शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना त्याने डाईव्ह मारली, पण मॅट हेनरीच्या अचूक थ्रो मुळे त्याला पॅव्हेलियनची वाट धरावी लागली.

तर झाले असे की, भारतीय संघाची पहिल्या डावातील फलंदाजी सुरू असताना न्यूझीलंडकडून १९ वे षटक टाकण्यासाठी रचिन रविंद्र गोलंदाजीला आला. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विराट कोहली स्ट्राइकवर होता.

त्यावेळी विराटने हलक्या हाताने शॉट खेळून १ धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र विराट धाव पूर्ण करणार इतक्यात मॅट हेनरीने चेंडू अडवला आणि एका हाताने डायरेक्ट थ्रो केला. हा चेंडू यष्टीला जाऊन लागला. विराटने डाईव्ह मारली खरी पण, चेंडू आधीच यष्टीला जाऊन लागला होता. त्यामुळे विराटला मान खाली घालून मैदानाबाहेर जावं लागलं.

विराट हा आंतरराष्ट्रीय क्रिकेमधील सर्वात फिट क्रिकेटपटू आहे. मात्र यावेळी त्याचा अंदाज चुकला. तो डाईव्ह मारूनही पोहचू शकला नाही. त्यामुळे त्याला स्वस्तात माघारी परतावं लागलं. दरम्यान विराट कोहली कसोटीत केवळ चौथ्यांदा धावबाद होऊन माघारी परतला आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा डाव २३५ धावांवर आटोपला. न्यूझीलंडकडून फलंदाजी करताना डॅरील मिशेलने सर्वाधिक ८२ धावांची खेळी केली. तर विल यंग ७१ धावांवर परतला. न्यूझीलंडचा संपूर्ण डाव २३५ वर आटोपला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

SCROLL FOR NEXT