Yashasvi Jaiswal Won the Player of the Month Award for February Month twitter
Sports

Yashasvi Jaiswal: रेकॉर्ड ब्रेकिंग जयस्वाल! शतक हुकलं, पण मोडले हे मोठे रेकॉर्ड

Yashasvi Jaiswal Record: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत यशस्वी जयस्वालने अर्धशतकी खेळी केली.

Ankush Dhavre

IND vs NZ 2nd Test,Day 3: पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या थरार सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघासमोर जिंकण्यासाठी ३५९ धावांचं आव्हान ठेवलं आहे.

या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघातील फलंदाज एकापाठोपाठ एक माघारी परतले. तर यशस्वी जयस्वालने एक बाजू धरुन ठेवली होती. त्याने या डावात फलंदाजी करताना ६५ चेंडूत ३ षटकार आणि ९ चौकांरासह ७७ धावांची शानदार खेळी केली. त्याची शतकाच्या दिशेने वाटचाल सुरु असताना मिचेल सँटनरने त्याला बाद करत माघारी धाडलं. दरम्यान शतक हुकलं असलं तरीदेखील त्याने मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत.

असा रेकॉर्ड करणारा पहिलाच भारतीय

यशस्वी जयस्वाल कसोटीतही निडर होऊन फलंदाजीसाठी ओळखला जातो. न्यूझीलंडविरुद्ध षटकार खेचताच त्याने एकाच वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

यशस्वी जयस्वाल हा एकाच वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत एकूण ३२ षटकार खेचले आहेत. तर एकूण रेकॉर्ड पाहिला, तर न्यूझीलंडचा माजी फलंदाज ब्रँडन मॅक्क्यूलम या यादीत अव्वल स्थानी आहे. मॅक्क्यूलमने २०१४ मध्ये एकूण ३३ षटकार खेचले होते.

मायदेशात खेळताना सर्वाधिक अर्धशतकं

जयस्वालने या सामन्यात ७७ धावांची खेळी केली. यासह त्याने यावर्षी नवव्यांदा ५० धावांचा पल्ला गाठला आहे. या अर्धशतकासह त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. तो एकाच वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये एकाच वर्षांत ९ किंवा त्यापेक्षा अधिक वेळेस ५० धावांचा पल्ला गाठणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.

जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसराच असा खेळाडू ठरला आहे, ज्याने हा कारनामा करुन दाखवला आहे. यापूर्वी २००६ मध्ये मोहम्मद युसूफने ९ वेळा अर्धशतक झळकावलं होतं.

भारतात कसोटी क्रिकेट खेळताना सर्वात वेगवान( चेंडूंच्या बाबतीत) १००० धावा करणारे फलंदाज

१३१५ चेंडू - यशस्वी जयस्वाल

१४३६ चेंडू - विरेंद्र सेहवाग

१५०६ चेंडू- रोहित शर्मा

भारतीय संघासाठी कसोटीत एकाच वर्षात १००० धावा करणारे सलामीवीर फलंदाज

सुनील गावसकर - १९७६, १९७८,१९७९, १९८३

विरेंद्र सेहवाग - २००४,२००८

गौतम गंभीर - २००८

यशस्वी जयस्वाल- २०२४

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT