IND vs NZ, 2nd Test 
Sports

IND vs NZ, 2nd Test, Day 2: न्युझीलंडच्या संघाला मोठी आघाडी, भारतीय संघावर पराभवाचं संकट

IND vs NZ, 2nd Test: भारत आणि न्युझीलंडमध्ये होत असलेल्या कसोटी सामन्यात न्युझीलंडच्या संघ भक्कम स्थितीत असून भारतीय संघासमोर पराभवाचं संकट निर्माण झालंय. पुणे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्युझीलंडने ३०१ धावांची आघाडी घेतली होती.

Bharat Jadhav

पुणे कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून दुसऱ्या दिवशी भारतीय संघांची खराब कामगिरी पाहायला मिळाली. संपूर्ण संघ अवघा १५७ धावांवर बाद झाला. त्यामुळे न्युझीलंडच्या संघाला १०३ धावांची आघाडी मिळाली. न्युझीलंडच्या संघाने पहिल्या डावात १०३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी खेळतांना ५ विकेट गमावत किवीच्या संघात १९८ धावा केल्या, यामुळे आता संघाने ३०१ धावांची आघाडी घेतलीय.

भारत आणि न्युझीलंडमध्ये कसोटी सामने खेळला जात आहे. पुणे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्युझीलंडने आपल्या पहिल्या डावात २५९ धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने पहिल्या दिवशी १ विकेट गमावत १६ धावा केल्या होत्या. मात्र दुसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. भारतीय फलंदाजांना फिरकी गोलंदाजीविरुद्धात खेळताना अडचणी आल्या. संपूर्ण संघ अवघ्या १५६ धावांमध्ये बाद झाला. यशस्वी जयस्वाल ३० धावा, शुभमन गिल ३० धावा, आणि रविंद्र जडेजाने ३८ धावा केल्या.

न्युझीलंडकडून गोलंदाजी करतांना गोलंदाज सेंटनरने ७ विकेट घेतल्या. सेंटनरने भारतीय संघाचा कणा तोडत संपूर्ण संघाला १५६ धावांमध्ये आपला डाव गुंडाळावा लागला. सेंटनरच्या घातक गोलंदाजीमुळे किवीच्या संघाला १०३ धावांची आघाडी मिळाली.

किवीच्या संघाने दुसऱ्या डावात चमकदार कामगिरी करताना ५ गडी गमावून १९८धावा केल्या. अशा प्रकारे संघाने एकूण ३०१ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने ८६ धावांची शानदार खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

BJP : भाजप नेत्याचा मुलाच्या कारमध्ये आढळले ड्रग्स, तरुणीसह पळून जाताना पोलिसाच्या अंगावर चढवली कार

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

SCROLL FOR NEXT