India Vs New Zealand 2nd ODI  BCCI
क्रीडा

Ind Vs NZ : हाल क्या हैं...टीम इंडियाच्या गोलंदाजांपुढे 'बेहाल'; न्यूझीलंडनं नोंदवले ३ 'नकोसे' रेकॉर्ड

India Vs New Zealand 2nd ODI : टीम इंडियाच्या गोलंदाजांनी खोचक मारा करून न्यूझीलंडच्या फलंदाजांना लोळण घेण्यास भाग पाडले.

Nandkumar Joshi

India Vs New Zealand 2nd ODI Live Updates : तेजतर्रार आणि घातक गोलंदाजी काय असते याचा याचि देही...अनुभव क्रिकेटप्रेमींनी आज रायपूरमध्ये घेतला. भारतीय क्रिकेट संघातील गोलंदाजांनी प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडच्या फलंदाजांना अक्षरशः लोळण घालायला लावली.

भारतीय गोलंदाजांच्या खोचक माऱ्यापुढे न्यूझीलंडचे फलंदाज फार काळ मैदानावर तग धरू शकले नाहीत. अवघ्या १५ धावांवरच निम्मा संघ गारद झाला. खेळपट्टी गोलंदाजांसाठी पोषक होती आणि त्याचा फायदा मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज यांनी घेतला आणि न्यूझीलंडचा फलंदाजीचा कणा मोडून काढला. ५ विकेटपैकी शमीनं २ विकेट घेतल्या. (Cricket News Updates)

पहिलं षटक टाकण्यासाठी आलेल्या मोहम्मद शमीनं एलन फिनला पाचव्या चेंडूवर त्रिफळाचित केलं. न्यूझीलंडला हा मोठा धक्का होता. त्या धक्क्यातून नंतर ते सावरलेच नाहीत. सिराजनं सहाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हेनरी निकोलसला बाद केलं. शुभमन गिलनं त्याचा झेल घेतला.

न्यूझीलंडला तिसरा धक्का शमीनं दिला. डेरिल मिशेलला अवघ्या एका धावेवर बाद केलं. हार्दिक पंड्यानं दहावं षटक टाकताना कॉन्व्हेची शिकार केली. त्याच्या पुढच्याच षटकात शार्दुल ठाकूरने कर्णधार टॉम लॅथमला तंबूत धाडलं. न्यूझीलंडचे ५ फलंदाज अवघ्या १५ धावांवर माघारी परतले होते.

भारताविरुद्ध सर्वात कमी स्कोअरवर ५ विकेट

न्यूझीलंडनं टीम इंडियाविरुद्ध रायपूरच्या सामन्यात सर्वात खराब कामगिरी केली. ५ विकेट अवघ्या १५ धावांत गमावले. हा सर्वात खराब विक्रम नोंदवला गेला. टीम इंडियाविरुद्ध इंग्लंडनं ओव्हलच्या मैदानावर २०२२ मध्ये २६ धावांवर ५ विकेट्स गमावल्या होत्या. कोलंबोमध्ये १९९७ मध्ये पाकिस्तानचे ५ गडी २९ धावांवर तंबूत परतले होते. २००५ मध्ये झिम्बाब्वेने टीम इंडियाविरुद्ध ३० धावांवर ५ विकेट गमावल्या होत्या.

अशाही एका खराब विक्रमाची नोंद

रायपूरमध्ये आज, टीम इंडियाविरुद्ध न्यूझीलंडने अवघ्या १५ धावांवर ५ गडी गमावले. श्रीलंकेविरुद्ध कोलंबोत २००१ मध्ये १८ धावांवर ५ गडी तंबूत परतले होते. तर बांगलादेशविरुद्ध मीरपूरमध्ये २०१० मध्ये ५ बाद २० धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फरीदाबादमध्ये २००३ मध्ये २१ धावांवर पाच गडी बाद झाले होते.

पॉवर प्लेमध्ये सर्वात कमी धावा

वनडेमध्ये पॉवर प्लेमध्ये (१ ते १० षटके) सर्वात कमी धावा करण्याचा नकोसा विक्रमही न्यूझीलंडने नोंदवला आहे. श्रीलंकेविरुद्ध २०१३ मध्ये फक्त १३ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०२२ मध्ये अवघ्या १४ धावा केल्या होत्या. तर भारताविरुद्ध रायपूरमध्ये आज, फक्त १५ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना मोठा धक्का;चंद्रकांत पाटील विजयाच्या वाटेवर

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT