rohit sharma virat kohli twitter
क्रीडा

IND vs NZ 1st Test: विराट- रोहित - सरफराज स्वस्तात माघारी! गेल्या २३ वर्षांत तिसऱ्यांदाच असा रेकॉर्ड झाला

Ankush Dhavre

IND vs NZ 1st Day 2 Live: काही दिवसांपूर्वी भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा निकाल अवघ्या अडीच दिवसात लागला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांवर आक्रमण करत चौकार- षटकारांचा पाऊस पाडला. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत असं झालेलं नाही. भारतीय संघाला १-१ धाव करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आहे. मात्र पहिल्या दिवसातील पहिल्या तासातच भारतीय संघाचं त्रिकूट तंबूत परतलं आहे.

विराट- रोहित- सरफराज स्वस्तात बाद

पहिल्या दिवशी पडलेला पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा फायदा, न्यूझीलंडच्या गोलंदाजीला झाला. गोलंदाजांना स्विंग आणि उसळी मिळत होती. त्यामुळे भारतीय फलंदाज अडचणीत आले. सलामीला आलेला रोहित शर्मा अवघ्या २ धावांवर बाद होऊन माघारी परतला.

रोहित पाठोपाठ विराटही शून्यावर माघारी परतला. शुभमन गिलच्या जागी फलंदाजीला आलेल्या सरफराजला मोठी खेळी करता आली नाही. तो भोपळाही न फोडता माघारी परतला. त्यामुळे अवघ्या १० धावांवर भारतीय संघाला ३ मोठे धक्के बसले.

गेल्या २३ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने रोहित- जयस्वालने तुफान फटकेबाजी करत सर्वात जलद ५०, सर्वात जलद १०० आणि २०० धावांचा रेकॉर्ड केला होता. मात्र या सामन्यातील पहिल्या डावातील सुरुवातीच्या १० षटकात भारतीय संघाला एकही चौकार मारता आलेला नाही.

कसोटी क्रिकेटमध्ये हे केवळ तिसऱ्यांदाच घडलंय. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने १४ धावा केल्या होत्या. तर ऑस्ट्रलेयाविरुद्ध २२ धावा केल्या होत्या. मात्र एकही चौकार मारला नव्हता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yusuf Pathan: 6,6,6,6,6,6,6,6,6...युसुफ पठाणचा कहर! शेवटच्या 12 चेंडूत चोपल्या 52 धावा

Ambernath Crime: मुलीचा करत नव्हती नीट सांभाळ, पतीने रागाच्या भरात पत्नीची गळा चिरून केली हत्या

Pre Wedding शूटसाठी खास लोकेशन, सास-बहू मंदिराला भेट द्याच

Maharashtra News Live Updates: समीर वानखेडे विधानसभेला लढणार नाहीत, त्या फक्त अफवाच

Maharashtra Navnirman Sena : मनसे अॅक्शन मोडवर; ठाण्यातून उमेदवारी देणार

SCROLL FOR NEXT