m chinnaswamy stadium twitter
Sports

IND vs NZ 1st Test: पावसाचा खेळ चाले... एकही चेंडू न टाकता पहिल्या दिवसाचा समारोप, चाहत्यांच्या आशेवर पाणी!

India vs New Zealand 1st Test News In Marathi: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पहिल्या कसोटी सामन्यातील पहिला दिवस पावसामुळे धुतला गेला आहे.

Ankush Dhavre

India vs New Zealand 1st Test Highlights: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. या कसोटीतील पहिला सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर सुरु आहे. मात्र या सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ एकही चेंडी न टाकता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या सामन्यातील पाचही दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यापैकी १ दिवस पावसामुळे धुतला गेला आहे. या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळू शकते. आता दुसऱ्या दिवसाचा खेळ होणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हा सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मदानावर सुरु आहे. या मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. हाच रेकॉर्ड कायम ठेवत, भारतीय संघ हा कसोटी सामना जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. रोहितने आधीच स्पष्ट केलंय, पाऊस आला तरीसुद्धा भारतीय संघ जिंकण्यासाठीच मैदानात उतरणार आहे.

आता पहिला दिवस पावसामुळे धुतला गेला आहे. त्यामुळे पुढील ४ दिवस कसा खेळ होतो, हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल. या दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ ३६ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान यादरम्यान भारतीय संघाने १७ कसोटी सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर २ सामने गमावले आहेत आणि १७ कसोटी सामने ड्रॉ झाले आहेत.

या मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ:

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप

न्यूझीलंड- टॉम लेथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), माइकल ब्रेसवेल (पहिल्या कसोटी सामन्यासाठी), मार्क चेपमन, डेव्हॉन कॉनवे, मेट हेनरी, डेरिल मिशेल, विल ओ'रूर्के, अजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र , मिशेल सँटनर, बेन सियर्स, ईश सोढी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टिम साउदी, केन विलियमसन, विल यंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: भारताऐवजी लंडनमध्ये राहण्याचा निर्णय का घेतला? विराट कोहलीने स्वतःच केला खुलासा

Voter List Fraud: व्होट चोरीचा आणखी एक पुरावा; बदलापूरमध्ये १७ हजार बाहेरील मतदार

Maharashtra Live News Update : नमाज पठाणावरुन शनिवारवाड्यात आंदोलन

Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

Raigad : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास दिरंगाई; पेणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिक मागो आंदोलन

SCROLL FOR NEXT