ind vs nz twitter
क्रीडा

IND vs NZ 1t Test Day 2: भारत- न्यूझीलंड सामन्याची वेळ बदलली! किती वाजता सुरु होणार सामना?

India vs New Zealand 1st Test Time: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याची वेळ बदलण्यात आली आहे. जाणून घ्या किती वाजता सुरु होणार सामना.

Ankush Dhavre

IND vs NZ, 1st Test: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना एम चिन्नास्वामीच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्याला १६ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार होती.

मात्र पहिल्या दिवशी बंगळुरूत तुफान पाऊस पडला. त्यामुळे पहिल्या दिवशी टॉसही होऊ शकला नाही. दरम्यान दुसऱ्या दिवशी बीसीसीआयने सामन्यातील वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना नियोजित वेळेनुसार, सकाळी ९:३० वाजता सुरू होणार होता. मात्र पहिल्या दिवशी जोरदार पाऊस पडला आणि दिवसाचा खेळ टॉस न होताच रद्द करण्यात आला. त्यामुळे बीसीसीआयने दुसऱ्या दिवसातील खेळ लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ हा आज म्हणजे १७ ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू आहे. पहिल्या दिवसाचा वेळ वाया गेल्यामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ लवकर सुरू करण्यात येणार आहे. आधी टॉस ९ वाजता केला जाणार होता.

आता टॉस ८:४५ ला केला जाईल. तर ९.१५ मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल. दुसऱ्या दिवसातील खेळातील पहिल्या आणि दुसऱ्या सेशनमध्ये अतिरिक्त १५ मिनिट जोडली जाणार आहेत. यासह दुसऱ्या दिवशी जर पावसाने हजेरी लावली नाही, तर ९८ षटकांचा खेळ होईल.

दुसऱ्या दिवसातील पहिला सेशन ९:१५ ला सुरू होऊन ११:३० वाजता संपेल. तर दुसऱ्या दिवसातील दुसरा सेशन १२:१० ल सुरू होईल आणि २:२५ ला संपेल. त्यानंतर तिसरा सेशन २:४५ ला सुरू होईल आणि ४: ४५ ला संपेल. जर या सामन्यात पावसाने हजेरी लावली नाही,तर दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पहायला मिळू शकतो

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

SCROLL FOR NEXT