IND vs ENG Twitter/@BCCI
Sports

IND vs ENG: भारत तिसरा सामना जिंकल्यास 35 वर्षाचा दुष्काळ संपणार

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. त्यातला तिसरा सामना २५ ऑगस्टपासून खेळला जाणार आहे.

वृत्तसंस्था

भारत आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. त्यातला तिसरा सामना २५ ऑगस्टपासून खेळला जाणार आहे. सध्या भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे. मालिकेतील पहिला सामना ड्रा झाला होता. पावसाने पाचव्या दिवशी बॅटींग केल्याने भारताला पहिसा सामना गमवावा लागला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यात लॅार्ड्सवर भारताने इंग्लडला पराभूत केले होते. आता तिसरा सामना (Third Test Match) भारतीय संघाने जिंकला तर मागच्या ३५ वर्षाचा रेकॅार्ड मोडणार आहे. https://www.youtube.com/watch?v=p-T_SLaYReg

तिसरा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेऊ शकते. मालिकेतील टीम इंडियाचा हा दुसरा विजय असू असेल. 1986 नंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा भारतीय संघ इंग्लंडमध्ये दोन कसोटी जिंकू शकणार आहे. १९८६ ला भारतीय संघ तीन सामन्यांची मालिका खेळला होता, त्यात दोन सामने भारतीय संघाने जिंकला होता. भारताने लॉर्ड्सवर पहिली कसोटी 5 गडी राखून जिंकली होती. तर दुसरी कसोटी लॅार्ड्वर 279 धावांनी जिंकली होती. तिसरी कसोटी बर्मिंगहॅममध्ये अनिर्णित राहिली होती. कपिल देव त्यावेळी भारताचा कर्णधार होता.

भारतीय संघ इंग्लंडमध्ये आतापर्यंत तीन मालिका जिंकला आहे. भारत पहिली मालिका १९७१ मध्ये जिंकला होता. तेव्हा भारताचा कर्णधार होता अजीत वाडेकर. त्यानंतर १९८६ मध्ये भारतीय संघाने दुसरी मालिका जिंकली होती. तेव्हा कर्णधार होता कपील देव. तिसरी मालिका भारताने राहूल द्रविडच्या नेतृत्वात २००७ मध्ये जिंकली होती. 2002 मध्ये एक मालिका अनिर्णित राहिली होती. त्यावेळी भारताचा कर्णधार सौरव गांगुली होता. आता विराट कोहलीला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे. या अगोदर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासोबत मालिका जिंकली होती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT