भारतीय खेळाडूंनी गाजविला दिवस; अ‍ॅथलेटिक्सह कुस्तीपटूंची कमाल

Indian athletes
Indian athletes
Published On

नैरोबी (केनिया) : येथे सुरु असलेल्या जागतिक ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने ४ बाय ४०० मीटर रिलेच्या पात्रता फेरीत ३ मिनीटे : २३ : ३६ अशी वेळ नाेंदवित स्पर्धेत विक्रम स्थापित केला. परंतु हिट २ मध्ये नायजेरियाच्या खेळाडूंनी ३ : २१ : ६६ अशी वेळ नाेंदवित भारतीय खेळाडूंचा विक्रम माेडला. दरम्यान भारतीय संघाने Indian athletes अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

भारतीय संघातील अब्दुल रझाक चेरनकुलंगरा रशीद, कपिल, प्रिया हब्बतानहल्ली मोहन, सुमी यांनी विक्रमी वेळ नाेंदविली. या स्पर्धेत झेक प्रजासत्ताकचे खेळाडूंनी ३ : २४ : १५ तसेच जमैकाच्या खेळाडूंनी ३ : २४ : ६५ अशी वेळ नाेंदवित अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय स्थानी राहिले.

भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी सात वाजून ३५ मिनीटांनी अंतिम फेरी हाेणार आहे. यामध्ये भारतीय संघ निश्चित उज्जवल कामगिरी करेल असा विश्वास क्रीडा रसिक समाजमाध्यांवर व्यक्त करीत आहेत.

ही स्पर्धा नैरोबी (केनिया) येथे २२ ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार आहे. या स्पर्धेत मंगळवारी भारतीय कुस्तीपटू रविंदरने ६१ किलो वजन गटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तसेच गौरव बलियान (७९ किलो) आणि दीपक (९७ किलो) यांनी कास्यपदक जिंकले.

रवींदरने २०१८ मध्ये आशियाई कॅडेट विजेतेपद पटकावले होते आणि २०१९ मध्ये २३ वर्षांखालील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदकही जिंकले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com