IND vs ENG Test Saam Tv
Sports

IND vs ENG Test: टीम इंडियात मोठा बदल; शुबमन गिल, पंतबाबत पडलेल्या प्रश्नांची उत्तरे अखेर मिळाली

IND vs ENG Test: रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर टीम इंडिया ही पहिलीच मालिका खेळत आहे. कर्णधाराव्यतिरिक्त काही नवीन चेहरे यात आहेत. पण एक प्रश्न सर्वात जास्त उपस्थित झाला आहे आणि तो म्हणजे कोहलीच्या जागी कोण फलंदाजी करेल?

Bharat Jadhav

भारत आणि इंग्लंडच्या संघात पहिला कसोटी सामना लीड्समध्ये खेळला जाणार आहे. शुक्रवारी २० जून रोजी हेडिंग्लेच्या मैदानावर ५ कसोटी सामन्याची मालिका खेळली जाणार आहे. या कसोटी मालिकेला एक दिवस बाकी असतानाच टीम इंडियाच्या संघात मोठा बदल करण्यात आलाय. दरम्यान टीम इंडियाचं नेतृत्व नवीन कर्णधार शुबमन गिल करणार आहे. त्यामुळे क्रिकेट रसिकांचे लक्ष शुबमन गिल आणि टीम इंडियाच्या कामगिरीवर असणार आहे.

भारतीय संघ कसं प्रदर्शन करणार या प्रश्नासह क्रिकेट रसिकांच्या मनात भारतीय फलंदाजी क्रमवारी बाबतही प्रश्न आहे. चौथ्या क्रमांकावर कोणता फलंदाज खेळणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे, चौथ्या क्रमांकवर फलंदाजी करण्यासाठी स्वत: कर्णधार शुबमन गिल मैदानात उतरणार आहे.

हेडिंग्ले मैदानावर कसोटी मालिका खेळली जाणार आहे. मालिका सुरू होण्याच्या आदल्या दिवशीच टीम इंडियानं सराव सुरू केलाय. सराव झाल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत उपकर्णधार ऋषभ पंतला पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारली होती. यात पत्रकारांनी पंतला फलंदाजीच्या क्रमवारीबाबतही प्रश्न केला होता. भारतीय फलंदाजीचा क्रम कसा असेल?

चौथ्या क्रमांकावर कोणता फलंदाज मैदानावर खेळण्यासाठी येईल, याचे उत्तर पंतनं दिलंय. भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीनं कसोटी मालिका सुरू होण्याआधीच कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. त्यामुळे विराटच्या जागेवर कोणता खेळाडू फलंदाजीसाठी येणार हा प्रश्न अनेकांना पडला होता. आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.

गिल चौथ्या तर पंत ५ व्या नंबरवर फलंदाजी करणार

कर्णधार शुबमन गिल विराट कोहलीच्या जागेवर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरेल. ऋषभ पंतला पत्रकारांनी याबाबत प्रश्न केला होता, त्यावर उत्तर देताना पंतनं सर्व तर्कांना पूर्ण विराम दिलाय. पत्रकार परिषदेत बोलताना पंत म्हणाला की, कर्णधार शुभमन गिल चौथ्या नंबरवर फलंदाजी करण्यासाठी येईल. तर मी पाचव्या नंबवर फलंदाजी करण्यासाठी येईल, असं पंतने पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना खुलासा केला.

दरम्यान शुभमन गिल सलामीवीर म्हणून फलंदाजी करायचा. त्याने आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात सुद्धा सलामीवीर म्हणून केली होती. पण गेल्या काही दिवसांपासून तो नंबर तीनवर फलंदाजी करत होता. आता त्याच्यावर कर्णधार पदाची जबाबदारी आहे, ही जबाबदारी येताच त्याने फलंदाजीचा क्रम बदलला आहे. इतकेच नाही तर पंतचा देखील फलंदाजी क्रम बदलला आहे.

तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळणार?

दरम्यान शुभमन गिलच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोणाला पाठवले जाईल याबाबत पंतने कोणतीच माहिती दिली नाहीये. पंत म्हणाला की, या स्थानावर कोणाला पाठवले जाईल याबद्दल संघात अजूनही चर्चा सुरू आहे. या स्थानासाठी विशेषतः दोन खेळाडूंची नावे येत आहेत , यात साई सुदर्शन आणि करुण नायरच्या नावाची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Silver Purity : तुम्ही खरेदी केलेलं सोनं खरे की बनावट? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने मिनिटात करा चेक

कपडे ठेवताना तुम्हीही करताय का 'ही' मोठी चूक? कपाट खराब होण्याआधी आजच जाणून घ्या सोप्या टिप्स

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

फडणवीसांनी त्यांना सोडलं तर समजायचं त्यांचाच हात आहे! व्हायरल ऑडिओ क्लिपवरून जरांगे पाटलांचा थेट इशारा

Dry Fruits Buying Tips: मिठाईऐवजी ड्रायफ्रूट्स आवडीने खाताय? थांबा, बाजारात आला बनावट सुकामेवा, असं ओळखा खरं काजू-बदाम

SCROLL FOR NEXT