भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत सिराज चमकला
सर्वाधिक विकेट्स घेण्याचा सिराजने केला विक्रम
सर्वाधिक ओव्हर्समध्ये गोलंदाजी करत रचला इतिहास
Ind vs Eng Test Series : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज चमकला आहे. संपूर्ण मालिकेतील प्रत्येक कसोटीमध्ये सिराज सहभागी झाला होता. त्याने भारतीय संघाला जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती भासू दिली नाही. या मालिकेत त्याने सर्वाधिक २३ विकेट्स घेतल्या आहे. कसोटी मालिकेत सर्वाधिक (१७३) ओव्हर्समध्ये गोलंदाजी करणारा सिराज हा भारताचा गोलंदाज बनला आहे.
पहिल्या कसोटीत २ विकेट्स, दुसऱ्या कसोटीत ७ विकेट्स, तिसऱ्या कसोटीत ४ विकेट्स, चौथ्या कसोटीत १ विकेट, पाचव्या कसोटीत ९ विकेट्स अशा प्रकारे अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीमध्ये मोहम्मद सिराजने २३ विकेट्स घेतल्या आहेत. गोलंदाजीसह फलंदाजीमध्येही सिराजने योगदान दिले आहे. एका प्रकारे, भारताच्या गोलंदाजी विभागाची जबाबदारी सिराजने उत्तमरित्या पेलवली.
तिसऱ्या कसोटीतील सिराजची विकेट
लॉर्ड्स कसोटीमध्ये भारताचा पराभव झाला होता. कसोटीच्या पाचव्या दिवसाच्या शेवटच्या सत्रामध्ये मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा शेवटच्या विकेटसाठी फलंदाजी करत होते. भारताला विजयासाठी फक्त २२ धावा हव्या होत्या. सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाल्याने रवींद्र जडेजा एका बाजूने खिंड लढवत होता. नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह यांनी जडेजाला साथ दिली. त्यानंतर सिराज आणि जडेजा झुंज देत होते. तेवढ्यात ७४ व्या ओव्हरमध्ये शोएब बशीरने सिराजला बाद केले. मालिकेतील सिराजसाठीची ही घटना महत्त्वाची ठरली होती.
पाचव्या कसोटीत व्हिलन ते हिरो
ओव्हल कसोटीमध्ये चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात इंग्लंडचे बेन डकेट आणि ऑली पोप हे बाद झाले होते. क्रीजवर हॅरी ब्रूक आणि जो रूट फलंदाजी करत होते. ३४ व्या ओव्हरमध्ये प्रसिद्ध कृष्णाने फेकलेल्या पहिल्याच चेंडूवर हॅरी ब्रूकला जीवनदान मिळाले. हॅरी ब्रूकने शॉट मारल्यानंतर सीमारेषेला असलेल्या सिराजने चेंडू झेलला, पण चुकीमुळे सीमारेषेवर त्याचा पाय लागला. झेल घेतल्यानंतर तो सीमारेषेच्या पार देखील गेला. यामुळे विकेटच्या ऐवजी हॅरी ब्रूकला जीवनदान मिळाले. याचा फायदा घेत ब्रूकने शतकीय कामगिरी केली. या चुकीमुळे सिराजला वाईट वाटले होते. दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेत, भारताला सामना जिंकवत सिराज हिरो बनला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.