IND vs Eng Test Ravi Shastri Reaction saam Tv
Sports

IND vs Eng Test: टीम इंडियाच्या तीन-चार खेळाडूंना दणका बसणार; पहिल्या कसोटीतील चुका महागात पडणार

IND vs Eng Test Ravi Shastri Reaction: सध्याचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ड्रेसिंग रूममधील खेळाडूंशी कठोर वागले पाहिजे. पहिल्या सामन्यात संघाचे क्षेत्ररक्षण निराशाजनक होते,असं रवी शास्त्री म्हणालेत.

Bharat Jadhav

इंग्लंडच्या क्रिकेट संघाने कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पाच विकेट राखत पराभव केला.पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पाच शतके केली तरीही संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. संघामधील खालच्या पातळीमधील फलंदाज आणि क्षेत्ररक्षणातील चुकांमुळे भारताला पराभवाची चव चाखावी लागली.याच पराभवाचा फटका आता संघातील काही खेळाडूंना बसणार असून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

याबाबत रवी शास्त्री यांनी प्रशिक्षक गौतम गंभीर यांना मोलाचा सल्ला दिलाय. प्रशिक्षक गौतम गंभीरनं आता कठोर भूमिका घेतली पाहिजे. चुका करणाऱ्या खेळाडूंवर कारवाई केली पाहिजे.ड्रेसिंग रुममध्ये त्यांना तंबी देत त्यांच्यावर आगपाखड केली पाहिजे असा सल्ला रवी शास्त्री यांनी गौतम गंभीरला त्यांनी दिलाय.

पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पाच शतके केली. तर इंग्लंडने दोन शतके झळकावली. तरी टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामुळे भारताला पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला. भारतीय संघात सर्व तरुण खेळाडू तरीही संघाला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागलं. त्यावरून दिग्गज किक्रेटर रवी शास्त्रीनं खेळाडूवर संताप व्यक्त केलाय. प्रशिक्षक गौतम गंभीरने ड्रेसिंग रुममध्ये सर्व खेळाडूंवर संताप केला पाहिजे असा सल्ला शास्त्री यांनी दिलाय.

भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे मते गौतम गंभीरने संघाच्या समस्या गांभीर्याने घ्याव्यात. वारंवार झालेल्या चुकांसाठी खेळाडूंना जबाबदार धरावे. गरज पडल्यास त्यांनी खेळाडूंना फटकारले पाहिजे. कोचिंग स्टाफचा मोठी भूमिका असते. यामुळे या सामन्याला पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे. कर्णधार शुबमन गिलनं चांगली कामगिरी केलीय. त्याने शतक झळकावलंय. कसोटी सामन्यात एक दोन नव्हे तर तब्बल ५ शतकं झाली.

त्याला सुरुवातीला काही गोष्टी चांगल्या करायच्या असतात, पण बऱ्याच गोष्टी असतात त्या हाताबाहेर असतात. झेल सुटणं हे कर्णधाराच्या नियंत्रणात नसलेली गोष्ट आहे. पण संघाला चांगल बनवावे लागेल. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही फलंदाजी मैदानात उतरतात तेव्हा तुम्हाला तुमच्या विकेटचं महत्त्व माहिती पाहिजे. पुढे बोलताना रवी शास्त्री यांनी प्रशिक्षक गौतम गंभीरला त्यांना एक सुचक सल्ला दिलाय.

प्रशिक्षक गौतम गंभीरने ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंसोबत कठोरपणे वागलं पाहिजे. त्यांना पराभवाची कारणं विचारली पाहिजे. त्याच्या संताप व्यक्त करा, त्यांना तंबी द्या. प्रत्येक खेळाडूशी वन टू वन चर्चा केली पाहिजे. दरम्यान इंग्लंडच्या पहिल्या आणि दुसऱ्या डावात भारतीय क्षेत्ररक्षकांनी अनेक झेल सोडले. यशस्वी जैस्वालने सर्वाधिक झेल सोडले. त्यावरून त्याच्यावर खूप टीका झाली. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतनेही अनेक झेल सोडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT