63 धावा बनवताच इतिहास रचेल विराट कोहली; असे करणारा तिसरा भारतीय फलंदाज Saam Tv
Sports

63 धावा बनवताच इतिहास रचेल विराट कोहली; असे करणारा तिसरा भारतीय फलंदाज

भारतीय संघाचा (Team India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मागच्या काही सामन्यात आपल्या खराब फॅार्मशी झगडत आहे.

वृत्तसंस्था

IND vs ENG: भारतीय संघाचा (Team India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मागच्या काही सामन्यात आपल्या खराब फॅार्मशी झगडत आहे. त्याने आपले शेवटचे शतक बरोबर दोन वर्षापुर्वी लगावले होते. इंग्लंडच्या मालिके दरम्यान सुद्धा विराट कोहलीची बॅट शांतच आहे. विराट कोहलीने 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचे शतक केले होते. लॅार्ड्सवर शानदार विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ लिड्सवर विजय मिळवण्यासाठी तयार आहे. या सामन्यात विराट कोहलीला एक खास विक्रम बनवण्याची संधी असणार आहे. तो विक्रम कोणता जाणून घेऊयात.

विराट कोहलीने आतापर्यंत 437 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 22,937 धावा बनवल्या आहेत. जर विराटने लीड्स कसोटीत आणखी 63 धावा केल्या तर विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 23,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणार आहे. केवळ दोन खेळाडूंनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी 23,000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. हे दोन्ही खेळाडू म्हणजे भारताचे माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर आहेत.

क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34,357 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर टीम इंडियाचा सर्वात विश्वासू खेळाडू राहुल द्रविडच्या नावावर 24,208 धावा आहेत. या दोन खेळाडूं व्यक्तीरिक्त श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा-28,016, माहेला जयवर्धने-25,927, रिकी पँटिंग-27,483, जॅक कॅलिस-25,534 यांनी कोहली पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

विराट कोहलीच्या खराब फॅार्ममुळे भारताची मधली फळी अतिशय खराब प्रर्दशन करत आहे. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांची बॅट मागच्या दोन सामन्यात शांत आहे. रहाणेने दुसऱ्या कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावून आपल्या फॉर्ममध्ये परत येण्याचे संकेत दिले आहेत. पण पुजारा, कोहली आणि रहाणे या तिघांनाही फॉर्मात परतण्यासाठी अजून एका मोठ्या खेळीची गरज आहे. आता हे पाहावे लागेल की लीड्स कसोटीतील या तिघांची बॅट तळपते का पुन्हा निराशेला सामोरे जावे लागते हे सामना झाल्यावरच समोर येईल.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

SCROLL FOR NEXT