Abhishek Sharma poor performance in T20 World Cup 2026 saamtv
Sports

टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज पुन्हा अपयशी; तिसऱ्यांदा बनला ऑफ-स्पिनरचा शिकार; अख्खा स्पर्धेत खराब कामगिरी

Abhishek Sharma : टी-२० विश्वचषकात अभिषेक शर्मा फलंदाजीत सातत्याने अपयशी ठरला आहे. फक्त झिम्बाब्वेविरुद्ध त्याने धमाकेदार अर्धशतक झळकावले. उर्वरित डावात अभिषेकने निराशा केली आहे.

Bharat Jadhav

  • टी-२० वर्ल्ड कप उपांत्य सामन्यात अभिषेक शर्मा पुन्हा अपयशी ठरला.

  • इंग्लंडविरुद्ध तो अवघ्या ९ धावा करून बाद झाला.

  • विल जॅक्सच्या ऑफस्पिनवर अभिषेक शर्माचा बळी गेला.

मुंबईतील वानखेडे मैदानावर होत असलेल्या भारत आणि इंग्लंडमधील टी२० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीतील दुसरा सामन्यातून अभिषेक शर्माला डच्चू मिळेल असं म्हटलं जात होतं. परंतु त्याच्यावर विश्वास ठेवत सूर्यकुमारनं त्याला मैदानात उतरवलं. इंग्लंडविरुद्धाच्या नॉकआऊट सामन्यात तो पुन्हा अपयशी ठरला. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात अवघ्या ९ धावा काढून अभिषेक पॅव्हेलियनमध्ये परतला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अभिषेकने सात चेंडूंचा सामना केला आणि दोन चौकार मारले. पण ऑफस्पिनर विल जॅक्सने त्याला बाद केले.

दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू विल जॅक्सने ८५.४ किमी प्रतितास वेगाने टाकला होता. अभिषेक शर्मा मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात होता, पण तो झेलबाद झाला. चेंडू बॅटच्या खालच्या भागात लागला, ज्यामुळे फिल सॉल्टकडे एक सोपा झेल गेला. अशाप्रकारे ऑफ-स्पिनर विल जॅक्सने अभिषेकची विकेट घेतली.

या विश्वचषकात अभिषेक शर्माला ऑफ-स्पिनरने बाद करण्याची ही तिसरी वेळ आहे. त्याने पाच डावांमध्ये ऑफ-स्पिनरचा सामना केला. चालू विश्वचषकात त्याने ऑफ-स्पिनरविरुद्ध २७ चेंडूत २९ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याची सरासरी ९.६६ आहे आणि त्याचा स्ट्राइक रेट १०७.४० आहे.

अभिषेक शर्मा विश्वचषकात (ऑफ-स्पिनर्सविरुद्ध)

एकूण डाव: ५

एकूण चेंडू: २७

धावा: २९

बाद: ३ वेळा

सरासरी: ९.६६,

स्ट्राइक रेट: १०७.४०

अभिषेक शर्माने सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात सलग तीन डावात शून्य धावांवर बाद झाला. त्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १५ धावांचे योगदान दिले. अभिषेकने झिम्बाब्वेविरुद्ध ५५ धावांची धमाकेदार खेळी खेळली. वेस्ट इंडिज (१० धावा) आणि इंग्लंडविरुद्ध तो जास्त धावा करू शकला नाही. चालू विश्वचषकात, अभिषेकने सात डावांमध्ये १२.७१ च्या निराशाजनक सरासरीने फक्त ८९ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युद्धाचा भडका, देशावर तेल संकट? गॅसच्या किंमती गगनाला भिडणार?

Titwala : टिटवाळ्यात टोळक्यांकडून घरावर हल्ला, संपूर्ण कुटुंबाला लोखंडी हत्याराने बेदम मारहाण

'डॉक्टरांचा विश्रांती घेण्याचा सल्ला, त्यामुळे...; राज्यसभेसाठी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांची सोशल मीडियावर खास पोस्ट

युद्धात ग्रॅव्हिटी बॉम्ब विध्वंस घडवणार? अमेरिकेचे सर्वात घातक अण्वस्त्र

Maharashtra Live News Update : क्लास चालू असतानाच कोसळला स्लॅब, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, कोपरखैरणेमधील घटना

SCROLL FOR NEXT