Shubman Gill Ind Vs Eng x
Sports

Ind vs Eng : एजबॅस्टनच्या विजयानंतर टीम इंडियात होणार बदल! शुभमन गिलने दिली मोठी माहिती, कुणाला मिळणार डच्चू?

India Vs England : शुभमन गिलच्या नेतृत्त्वामध्ये भारताने एजबॅस्टन स्टेडियमवर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. लॉर्ड्सवर तिसरा सामना जिंकत मालिकेत आघाडी घेण्यासाठी भारताचा संघ सज्ज झाला आहे.

Yash Shirke

Ind vs Eng Test Series : बर्मिंगहॅममध्ये शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने इतिहास रचला. ५८ वर्षांनंतर भारतीय कसोटी संघाने बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर विजय मिळवला. आता लॉर्ड्सवर विजय मिळवत कसोटी मालिकेत आघाडी घेणे हे भारतीय संघाचे लक्ष्य असणार आहे. जसप्रीत बुमराह लॉर्ड्सवर खेळेल, अशी माहिती कॅप्टन शुभमन गिलने दिली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसरा सामना १० जुलैपासून खेळला जाणार आहे.

एजबॅस्टन कसोटी सामन्यानंतर शुभमन गिलला 'जसप्रीत बुमराह तिसऱ्या कसोटीमध्ये खेळणार का?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शुभमन गिलने एका शब्दात होकारार्थी उत्तर दिले. आता जर जसप्रीत बुमराह लॉर्ड्समधील कसोटी सामन्यात सहभागी होणार असेल तर एजबॅस्टन कसोटी खेळणाऱ्या ११ शिलेदारांपैकी कोणाला डच्चू दिला जाईल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघात ३ बदल करण्यात आले होते. आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी यांना खेळवण्यात आले. या सामन्यामध्ये जसप्रीत बुमराहच्या जागी आकाश दीपला खेळवण्यात आले. त्याने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ६ अशा संपूर्ण सामन्यात १० विकेट्स घेतल्या. त्यामुळे आकाश दीपला लॉर्ड्सवर खेळवले जाईल.

जसप्रीत बुमराह संघात परतत असल्याने तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये नितीश कुमार रेड्डी किंवा प्रसिद्ध कृष्णा यांना डच्चू मिळू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. मधल्या आणि खालच्या फळीतील फलंदाजी टिकून राहावी यासाठी नितीशला संघात सामील केले होते. पण त्याने निराशा केली, पहिल्या डावात शून्य, तर दुसऱ्या डावात एक धाव करुन तो बाद झाला. त्याने एकही विकेट घेतली नाही. दुसऱ्या बाजूला प्रसिद्ध कृष्णाही गोलंदाजीत फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. दोन्ही डावात त्याने प्रत्येक ओव्हरमध्ये ६ पेक्षा जास्त धावा दिल्या. तो खूप महागडा देखील ठरला. यामुळे तिसऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात या दोघांपैकी एकाला खेळण्याची संधी मिळणार नाही असे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT