rohit sharma twitter
Sports

Rohit Sharma Memes: हिटमॅनचा दरारा, कालपण आणि आजपण! रोहितने शतक पूर्ण करताच ट्रोलर्सची बोलती बंद

Rohit Sharma Viral Memes: भारताचा कर्णधार रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली. या शतकी खेळीनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे.

Ankush Dhavre

कटकच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात फक्त हिटमॅनची हवा पाहायला मिळाली. गेले काही महिने रोहित शर्माची बॅट शांतच होती. मात्र या सामन्यात त्याने ९० चेंडूंचा सामना करत ११९ धावांची तुफानी खेळी केली.

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत. या स्पर्धेपूर्वी रोहित शर्मा फॉर्ममध्ये येणं ही भारतीय संघासाठी अतिशय समाधानकारक बाब आहे. दरम्यान रोहितच्या शतकी खेळीनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तो केवळ वनडे आणि कसोटी क्रिकेट खेळताना दिसून येतोय. काही महिन्यांपासून कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता.

त्यानंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतही त्याची बॅट शांत राहिली होती. या मालिकेत त्याला अवघ्या २९ धावा करता आल्या होत्या. त्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यातही तो स्वस्तात माघारी परतला होता. आता दुसऱ्या वनडेत त्याने शानदार कमबॅक केलं आहे.

रोहितचं शतक, काय म्हणाले फॅन्स?

ज्यावेळी रोहित शर्माचा फ्लॉप शो सुरु होता. त्यावेळी त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. फॅन्ससह अनेक दिग्गजांनी रोहितला निवृत्ती घेण्याचाही सल्ला दिला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत रोहितने स्वत: बाहेर बसण्याचा निर्णय घेतला होता. आता कटकमध्ये शतक झळकावून त्याने ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे. यापूर्वीही अनेक द्विपक्षीय मालिकांमध्ये रोहित फ्लॉप ठरलाय.

मात्र आयसीसीच्या स्पर्धांमघ्ये संघ अडचणीत असताना, त्याने अनेकदा संघासाठी महत्वपूर्ण धावा केल्या आहेत. आता भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी दुबईला जाणार आहे. या स्पर्धेपूर्वी रोहित फॉर्ममध्ये येणं हे भारतीय संघासाठी शुभसंकेत आहेत.

भारताचा दणदणीत विजय

या सामन्यात इंग्लंडचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला ३०४ धावांपर्यंत मजल मारता आली. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ३०५ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना, भारतीय संघाकडून रोहित शर्माने ११९ धावांची खेळी केली. तर शुभमन गिलन ६० धावांची खेळी करुन विजय खेचून आणला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT