IND vs ENG Match Ticket saam tv
Sports

IND vs ENG Match Ticket: भारत-इंग्लंड वनडे तिकिटासाठी चेंगराचेंगरी; चाहत्यांची पळापळ, काहीजण बेशुद्ध

IND vs ENG Match: भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा वनडे सामना ओडिशातील कटक येथे होणार आहे. क्रिकेट सामन्याची तिकीट विक्रीवेळी चेंगराचेंगरी झालीय. बऱ्याच दिवसांनंतर कटकमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन केले जातंय.

Bharat Jadhav

भारतविरुद्ध इंग्लंड एकदिवशीय मालिकेचे सामने उद्यापासून खेळवले जाणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये तर दुसरा सामना कटकमध्ये होणारय. दुसऱ्या सामन्यासाठी तिकीट विक्री सुरू झालीय. या तिकीट विक्रीवेळी चेंगराचेंगरी झालीय. यात काहीजण बेशुद्ध झाले आहेत. दरम्यान डिसेंबर २०१९ नंतर प्रथमच कटकमध्ये एकदिवसीय सामना खेळवले जाणार आहेत. त्यामुळे क्रिकेट रसिकांनी मोठी गर्दी केली होती.

सामन्याच्या तिकीट खरेदीसाठी चाहत्यांनी मंगळवारी रात्रीपासून बाराबती स्टेडियमबाहेर गर्दी केली होती. ऑफलाइन तिकीट काउंटर उघडल्यानंतर गोंधळ उडाला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे तिकीट काढण्यासाठी मोठी गर्दी झाली त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. तिकीट घेणाऱ्यांना चाहत्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा फवारा मारला.

चेंगराचेंगरीत काही लोक बेशुद्ध झालेत. गर्दीवर नियंत्रण न राहिल्याने मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला. स्थानिकांनी प्रशासनावर चुकीचे नियोजन आणि अपुऱ्या सुविधांमुळे ही घटना घडल्याच म्हटलं जातंय. पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आणि जाण्यायेण्याचा योग्य मार्ग तयार केले नसल्याची टीका अनेक चाहत्यांनी यावेळी केला.

इंग्लंड आणि भारताचा एकदिवशीय सामना पाहण्यासाठी तिकिटे काढण्यासाठी क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने स्टेडियमवर गर्दी केली. त्यामुळे तिकीट घेण्यासाठी काउंटरवर चढू लागले. त्यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले. या सर्व प्रकारामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांना गर्दीवर लाठीचार्जसह पाण्याच्या तोफांचा अवलंब करावा लागला.

मंगळवारी रात्रीपासूनच हजारो क्रिकेट रसिक आपल्याला तिकिट मिळावं यासाठी स्टेडियमवर जमलेत. बुधवारी पहाटेपर्यंत लांबलचक रांगा लागल्या होत्या. बुधवारी सकाळी ९ वाजता ऑफलाइन तिकीटांची विक्री सुरू झाली, तेव्हा गर्दी झपाट्याने वाढली. तिकीट उपलब्ध असल्याची माहिती पसरताच, परिस्थिती आणखी बिघडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दर घसरले

Sleep Secrets: रात्री झोपताना एक पाय बाहेर काढण्याची सवय चांगली की वाईट? तज्ज्ञांनी सांगितली कारणे

धनत्रयोदशीनिमित्त मोठी खुशखबर! १० तोळं सोनं १९,१०० रूपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले

IMD Weather Alert: धनत्रयोदशीला आस्मानी संकट येणार, ४८ तास पाऊस धो धो कोसळणार, IMD कडून गंभीर इशारा

Mumbai Heat News : मुंबईकरांना ऑक्टोबर हिटचा तडाखा, पारा 37 अंशावर | VIDEO

SCROLL FOR NEXT