IND Vs ENG ODI Match : सोशल मीडियावरून क्रिकेट सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार; नागपुरातून दोन तरुण ताब्यात

Nagpur News : भारत आणि इंग्लंडमध्ये पाच टी २० सामन्यांची मालिका संपली आहे. यात भारताने ४-१ अशी मालिका जिंकली असून आता या दोन देशांमध्ये तीन वन- डे सामन्यांची मालिका ९ ते १२ फेब्रुवारी दरम्यान खेळविली जाणार आहे
IND Vs ENG ODI Match
IND Vs ENG ODI MatchSaam tv
Published On

पराग ढोबळे 
नागपूर
: भारत आणि इंग्लंड यांच्या पाच टी २० सामन्यांची मालिका संपल्यानंतर वन डे मालिका खेळविण्यात येणार आहे. उद्यापासून (६ फेब्रुवारी) या मालिकेला सुरवात होत असून नागपूरातील मैदानावर पहिला सामना खेळविण्यात येणार आहे. मात्र ६ फेब्रुवारीला होणाऱ्या भारत विरूद्ध इंग्लड सामन्याचा इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिकिटांचा काळाबाजार केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. 

भारत आणि इंग्लंडमध्ये पाच टी २० सामन्यांची मालिका संपली आहे. यात भारताने ४-१ अशी मालिका जिंकली असून आता या दोन देशांमध्ये तीन वन- डे सामन्यांची मालिका ९ ते १२ फेब्रुवारी दरम्यान खेळविली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे ६ फेब्रुवारीला खेळविला जाणार आहे. हा सामना पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमी तिकीट खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. मात्र यात तिकिटांचा काळाबाजार केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. 

IND Vs ENG ODI Match
NIA Raid : इंदापूरमध्येही तपास यंत्रणांची छापेमारी; नेचर डिलाईट डेअरीमध्ये सकाळपासूनच तपासणी

सोशल मीडियावरून तिकिटांची विक्री 
दरम्यान भारत व इंग्लंड यांच्यात पहिला एकदिवसीय सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर डे- नाईट असा खेळविला जाणार आहे. सामना एक दिवसावर असल्याने येथे तिकीट विक्री करण्यास सुरवात करण्यात आली आहे. यामुळे तिकीट घेण्यासाठी क्रिकेट प्रेमींच्या रांगा लागल्या आहेत. जवळपास सर्व तिकिटांची विक्री झाली असल्याने अनेकांना तिकीट मिळत नाही. याचा फायदा घेत ब्लॅकमध्ये तिकीट विक्री करण्यात येत होती. 

IND Vs ENG ODI Match
Fraud Case : शेती अनुदान देण्याच्या नावाने फसवणूक; वृध्द महिलेस दोन लाख १५ हजार रुपयांत गंडविले

दोनजण ताब्यात 

दरम्यान सोशल मीडियावरून तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सायबर गुन्हे शाखेने ऑनलाईन इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाच्या मध्ये विक्री करत असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी शोध घेत दोन व्यक्तीना ताब्यात घेतले आहे. यात अजहर शेख आणि रोहित झाडे दोघांनी संगमत करून विकत असल्याचे समोर आले असून या दोन तरूणाकडून ५ तिकीट जप्त करत कारवाई करण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com