IND vs ENG 2nd Test Score  Ani
Sports

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

IND vs ENG 2nd Test Score : टीम इंडिया आपला डाव घोषित इंग्लंडच्या संघासमोर मोठं टार्गेट ठेवलंय. यावेळी शुबमन गिलची धमाकेदार फलंदाजी पाहायला मिळाली.

Bharat Jadhav

भारताने इंग्लंडसमोर भलं मोठ्या धावांचे लक्ष्य ठेवलंय. भारताने दुसऱ्या डावात ६ गडी गमावून ६२७ धावा केल्या आणि डाव आपला घोषित केला. दुसऱ्या डावात भारताकडून कर्णधार शुबमन गिलने सर्वाधिक धावा केल्या. गिलने १६१ धावांची खेळी केली. केएल राहुल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतके झळकावली.

टीम इंडियाने आपला दुसरा डाव ६ विकेट गमावून ४२७ धावांवर घोषित केला आहे. या डावात भारताकडून गिलने सर्वाधिक १६१ धावा केल्या. त्याला केएल राहुल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकांची साथ मिळाली. सर्वांच्या योगदामुळे टीम इंडियानं इंग्लंडसमोर ६०० पेक्षा जास्त धावांचे आव्हान ठेवलंय. अशा परिस्थितीत इंग्लंडला जिंकण्यासाठी ६०८ धावा कराव्या लागणार आहेत. भारतीय कर्णधार शुबमन गिलनेही दुसऱ्या डावात शतक पूर्ण केलं. त्याने १२९ चेंडूत १०० धावांचा टप्पा गाठला. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ८ वं शतक होतं .

सामन्याच्या चौथ्या दिवशी करुण नायर चांगली कामगिरी करेल असं अपेक्षित होतं, परंतु तो २६ धावा काढून बाद झाला. दुसऱ्या बाजुला दुसरा सलामीवीर केएल राहुलने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत ८४ चेंडूत १० चौकारांसह ५५ धावा केल्या. के एल राहुल बाद झाल्यानंतर कर्णधार शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांनी तुफानी फलंदाजी केली.

चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये ११० धावांची भागीदारी झाली. पंतने फक्त ५८ चेंडूत ६५ धावा केल्या, यात ८ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. ऋषभ पंत बाद झाल्यानंतर, शुबमन गिलने रवींद्र जडेजासोबत डाव पुढे नेला. दुसऱ्या डावातही शुबमन शतक करण्यात यशस्वी झाला. शुबमनने १३० चेंडूत ९ चौकार आणि तीन षटकारांसह शतक पूर्ण केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab : शिवाली परब विठ्ठल नामात दंग, पाहा मनमोहक फोटो

BJP Leader: भाजप नेत्याला घेरत जीवघेणा हल्ला, भररस्त्यात संपवलं; आरोपी घटनास्थळावरुन फरार

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

SCROLL FOR NEXT