
आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात १३ वर्षीय वैभव सूर्यवंशीवर कोटींची बोली लागली होती. या लिलावात त्याला राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात स्थान दिलं. दरम्यान आता त्याला भारतीय अंडर १९ संघाकडून अंडर १९ एशिया कप स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली आहे.
या स्पर्धेतील सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. मात्र तिसऱ्या सामन्यात त्याला चांगलाच सुर गवसला आहे. या सामन्यात त्याने वादळी अर्धशतकी खेळी केली आहे.
भारत आणि यूएई यांच्यात झालेल्या सामन्यात फलंदाजी करताना वैभवने ४६ चेंडूंचा सामना करत नाबाद ७६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि ६ षटकार खेचले. यासह चौकार- षटकारांच्या साहाय्याने त्याने ४८ धावा कुटल्या.
वैभवने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या यूथ कसोटी मालिकेत शानदार शतकी खेळी केली होती. त्यानंतर त्याला एकही मोठी खेळी करता आली नव्हती.
अंडर १९ एशिया कप स्पर्धेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये तो स्वस्तात माघारी परतला होता. मात्र यूएईविरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात त्याने टी-२० स्टाईल फलंदाजी केली. भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना यूएईला ४४ षटकात १३७ धावांवर ऑल आऊट केलं. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना, भारतीय संघाने हे आव्हान अवघ्या १६.१ षटकात पूर्ण केलं.
भारतीय संघाला येत्या ६ डिसेंबरला सेमीफायनलचा सामना खेळायचा आहे. हा सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हे दोन्ही सामने जिंकणारे संघ फायनलमध्ये भिडणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.