jos buttler, England vs Afghanistan/twitter saam tv
Sports

Jos Buttler Statement: दारुण पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार खचला; म्हणतो,' आम्ही चांगलं खेळलो पण...'

India vs England, World Cup: या सामन्यानंतर कर्णधार जोस बटलरने मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

Jos Buttler Statement:

इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने १०० धावांनी जोरदार विजय मिळवला. हा भारतीय संघाचा या स्पर्धेतील सलग सहावा विजय आहे. या विजयासह भारतीय संघाने पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे.

तर इंग्लंडचा संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. दरम्यान या पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर निराश झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

या सामन्यानंतर बोलताना जोस बटलर म्हणाला की,'मैदान दव पडणार की नाही याची आम्हाला खात्री नव्हती. तरीदेखील आमच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. आम्ही भारतीय संघाला २२९ धावांवर रोखलं. आमच्या फलंदाजांना दबाव हाताळता आला नाही. आम्हाला भागीदारीची गरज होती, मात्र आमचे फलंदाज भागीदारी करू शकले नाही. आमच्यावर स्कोअर बोर्डचा कुठलाही दबाव नव्हता. मात्र फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. आमच्या संघाने निराशाजनक कामगिरी केली.' (Latest sports updates)

तसेत तो पुढे म्हणाला की,' आम्ही पावरप्लेमध्ये चांगली गोलंदजी केली. त्यावेळी खेळपट्टीवर चेंडू उसळी घेत होता. गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षकांनीही चांगली गोलंदाजी केली. आज आमचा दिवस होता. मात्र आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही.'

या सामन्यात विजय मिळवल्याचा भारतीय संघाला मोठा फायदा झाला आहे. ६ पैकी ६ सामने जिंकून १२ गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.

तर केवळ १ सामना जिंकणारा इंग्लंडचा संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. भारतीय संघाचा पुढील सामना येत्या २ नोव्हेंबर रोजी श्रीलंकेविरूद्ध होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT