ind vs eng 5th test james anderson completed 700 wickets in test cricket becomes the only pacer to do so  twitter
क्रीडा

James Anderson 700 Wickets: ऐतिहासिक! जेम्स अँडरसनच्या कसोटीत 700 विकेट्स पूर्ण! शेन वॉर्नला मागे टाकण्याची संधी

India vs England 5th Test: भारत-इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी कुलदीप यादवला बाद करताच जेम्स अँडरसनने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Ankush Dhavre

India vs England 5th Test, James Anderson Record News:

भारत-इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी कुलदीप यादवला बाद करताच जेम्स अँडरसनने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. जेम्स अँडरसन हा कसोटी क्रिकेटमध्ये ७०० गडी बाद करणारा पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला आहे. तर कसोटी क्रिकेटमधील तिसराच गोलंदाज ठरला आहे.

कसोटीत रचला इतिहास..

जेम्स अँडरसन हा कसोटी क्रिकेटमध्ये ७०० गडी बाद करण्याचा पल्ला गाठणारा जगातील तिसरा गोलंदाज ठरला आहे. तर जगातील पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याचा रेकॉर्ड हा श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे.

मुरलीधरनच्या नावे कसोटीत ८०० गडी बाद करण्याची नोंद आहे. तर दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज शेन वॉर्न आहे. शेन वॉर्नच्या नावे ७०८ गडी बाद करण्याची नोंद आहे. आता जेम्स अँडरसनने ७०० गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत प्रवेश केला आहे. (Cricket news in marathi)

जेम्स अँडरसनने २००३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या लॉर्ड्स कसोटीतून पदार्पण केलं होतं. ४१ वर्षीय जेम्स अँडरसनने आतापर्यंत २० वर्ष इंग्लंड संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याने हा कारनामा १८७ व्या सामन्यातील ७०० व्या सामन्यात करुन दाखवला आहे. या वयात गोलंदाज क्रिकेटला रामराम करत असतात. मात्र जेम्स अँडरसन अजूनही आपल्या संघासाठी संकटमोचक ठरतोय .

भारतीय संघाचा डाव आटोपला...

धरमशालेत सुरु असलेल्या या सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव ४७७ धावांवर संपुष्टात आला आहे. यासह भारतीय संघाने २५९ धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने १०३ आणि शुभमन गिलने ११० धावांची खेळी केली. तर यशस्वी जयस्वालने ५७, देवदत्त पडिक्कलने ६५ आणि सरफराज खानने ५६ धावांची खेळी केली. या कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने या सामन्यावर मजबूत पकड बनवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

SCROLL FOR NEXT