- मँचेस्टरमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सुरु आहे.
- या सामन्यामध्ये इंग्लंडकडे ३११ धावांची आघाडी आहे.
- सामन्याच्या दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला भारताने दोन विकेट गमावल्या आहेत.
Ind vs Eng 4th Test : मँचेस्टर कसोटी सामना भारताच्या हातून निसटत चालला असल्याचे पाहायला मिळत आहे. सामन्याच्या सुरुवातीपासून इंग्लंडचा संघ भारतावर वरचढ ठरत राहिला. सुरुवातीला भारताला फलंदाजीत आणि नंतर गोलंदाजीत मात मिळाली. सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडने ६६९ धावांचा डोंगर रचला आहे. दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला इंग्लंडकडे ३११ धावांची आघाडी आहे. दुसऱ्या डावाच्या सुरुवातीलाच यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन शून्यावर बाद झाल्याने भारताची अवस्था दुष्काळात तेरावा महिना अशी झाली आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड मँचेस्टर कसोटी सामन्यामध्ये इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय संघाला ३५८ धावांवर रोखले. यशस्वी जैस्वालने ५८ धावा, केएल राहुल ४६ धावा, साई सुदर्शनने ६१ धावा, रिषभ पंतने ५४ धावा आणि शार्दुल ठाकूरने ४१ धावा करत संघाला ३५० धावांच्या पुढे नेले. शुभमन गिल फ्लॉप झाला.
इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. सलामीच्या जोडीने १०० अधिक धावांची भागीदारी केली. झॅक क्रॉली ८४ धावा आणि बेन डकेट ७१ धावा अशी शानदार सुरुवात इंग्लंडला मिळाली. ओली पोपने त्याच्या ७१ धावा जोडल्या. जो रूटने तब्बल १५० धावांची दमदार खेळी केली. त्याच्यासोबत कर्णधार बेन स्टोक्सने १४१ धावा करत इंग्लंडचा डाव ६०० पार नेला. इंग्लंडच्या खालच्या फळीतील खेळाडू ब्रायडन कार्स (४७ धावा), लियाम डॉसन (२६ धावा) यांनीही मौल्यवान कामगिरी केली. सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा संघ ६६९ धावांवर ऑलआउट झाला.
त्यानंतर भारतीय संघाचे सलामीवीर पुन्हा फलंदाजीसाठी आले. पण पहिल्याच ओव्हरमध्ये ख्रिस वोक्सने सुरुवातीला यशस्वी जैस्वाल आणि नंतर साई सुदर्शन या दोघांना माघारी पाठवले. जो रूटने यशस्वीला, तर हॅरी ब्रूकने साईला झेलबाद केले. सध्याची परिस्थिती पाहता, भारताला हा सामना जिंकणे अशक्य वाटत आहे. इंग्लंडने सर्व आघाडींवर भारतावर मात केल्याचे पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.