ravindra jadeja saam tv news
क्रीडा

Ravindra Jadeja Record: राजकोटमध्ये जडेजा 'राज'! शतक झळकावताच कपिल देव अन् अश्विनच्या खास रेकॉर्डच्या यादीत प्रवेश

Ankush Dhavre

IND vs ENG 3rd Test, Ravindra Jadeja Record News:

राजकोटच्या मैदानावर खेळताना रविंद्र जडेजाची (Ravindra Jadeja) बॅट नेहमीच तळपते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार राजकोटच्या मैदानावर सुर आहे. या सामन्यातील पहिल्याच दिवशी जडेजाने फलंदाजी करताना ११० धावांची खेळी केली आहे. त्याने रोहित शर्मा आणि सरफराज खानसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. यादरम्यान राजकोटच्या मैदानावर त्याने कपिल देव आणि आर अश्विनसारख्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला आहे. (IND vs ENG 3rd Test)

राजकोट कसोटीत शतकी खेळी करताच रविंद्र जडेजाने अशा खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला आहे ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना ३ हजार पेक्षा अधिक धावा आणि गोलंदाजी करताना २०० पेक्षा अधिक गडी बाद केले आहेत. याबाबतीत भारताचे दिग्गज खेळाडू कपिल देव अव्वल स्थानी आहेत.

कपिल देव यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत गोलंदाजी करताना ४३४ गडी बाद केले होते. तर फलंदाजीत त्यांनी ५२४८ धावा कुटल्या. या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या आर अश्विनने फलंदाजीत ३२७१ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना त्याने ४९९ गडी बाद केले आहेत. या दिग्गज खेळाडूंच्या यादीत रविंद्र जडेजानेही स्थान मिळवले आहे. शतकी खेळीसह जडेजाने कसोटीत ३ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तर गोलंदाजीत त्याने आतापर्यंत २८० गडी बाद केले आहेत. (Cricket news in marathi)

राजकोटचा राजा जडेजाच..

राजकोटच्या मैदानावर खेळताना रविंद्र जडेजाचा रेकॉर्ड शानदार राहिला आहे. २०१८ मध्ये वेस्टइंडीजविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने शतकी खेळी केली होती. आता इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात त्याने शतक झळकावलं आहे. सामन्यातील दुसऱ्या दिवशी त्याला आणखी मोठी खेळी करण्याची संधी असणार आहे. तर याच मैदानावर प्रथम श्रेणी क्रिकेट खेळताना त्याचा रेकॉर्ड पाहिला तर त्याने १२ सामन्यांमध्ये ६ शतक आणि ४ अर्धशतकांच्या साहाय्याने १५६४ धावा केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

SCROLL FOR NEXT