Ind Vs Eng x
Sports

Ind Vs Eng : प्रसिद्ध क्रिकेटपटूचे निधन, भारत-इंग्लंड सामन्यादरम्यान खेळाडूंनी वाहिली श्रद्धांजली

India Vs England Test : भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यामध्ये भारत आणि इंग्लंड दोन्ही संघातील खेळाडूंनी दंडाला काळी पट्टी बांधल्याचे पाहायला मिळत आहे.

Yash Shirke

IND VS ENG 2nd Test : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसरा सामना बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन स्टेडियमवर सुरु झाला आहे. या सामन्यामध्ये इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना सुरु होण्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू मैदानात उतरले. सर्व खेळाडूंच्या दंडाला काळी पट्टी बांधल्याचे पाहायला मिळाले. खेळाडूंसह सर्वजणांनी माजी इंग्लिश क्रिकेटपटू वेन लार्किन यांना श्रद्धांजली वाहिली.

भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान वेन लार्किन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खेळाडूं काळी पट्टी बांधून मैदानात उतरले. २८ जून २०२५ रोजी वेन लार्किन यांनी जगाचा निरोप घेतला. बऱ्याच काळापासून ते गंभीर आजाराने ग्रस्त होते. वयाच्या ७१ व्या वर्षी वेन लार्किन यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे क्रिकेटजगतात शोककळा पसरली आहे.

१९७९ ते १९९१ या दरम्यान वेन लार्किन इंग्लंड संघाकडून १३ कसोटी आणि २५ वनडे सामने खेळले होते. त्यांनी २५ कसोटी डावांमध्ये २०.५४ च्या सरासरीने ४८३ धावा केल्या होत्या. २४ एकदिवसीय सामन्यांमध्ये वेन यांनी २४.६२ च्या सरासरीने ५९१ धावा केल्या. वेन लार्किन यांनी नॉर्थम्प्टनशायर, डरहम आणि बेडफोर्डशायर या संघांचे प्रतिनिधित्व केले होते.

वेन लार्किन यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकूण ४८२ प्रथम श्रेणी आणि ४८५ लिस्ट ए सामन्यांमध्ये भाग घेतला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळताना त्यांनी ८४२ डावांमध्ये ३४.४४ च्या सरासरीने २७१४२ धावा केल्या होत्या. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये ४६७ डावांमध्ये वेन लार्किन यांनी ३०.७५ च्या सरासरीने १३५९४ धावा केल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

SCROLL FOR NEXT