shubman gill  twitter
क्रीडा

Shubman Gill Statement: शतक झळकावल्यानंतर जल्लोष का केला नाही? गिलने सांगितलं खरं कारण

IND vs ENG 2nd Test: शतक झळकावल्यानंतर सेलिब्रेशन का केलं नाही? गिलने यामागचं कारण सांगितलं आहे.

Ankush Dhavre

Shubman Gill, IND vs ENG 2nd Test:

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीतील (IND vs ENG 2nd Test) दुसऱ्या डावात शुभमन गिलला (shubman Gill) सुर गवसला आहे. भारतीय संघ अडचणीत असताना त्याने शतकी खेळी करत संघाला मजबूत स्थितीत पोहचवलं आहे. या डावात त्याने १०४ धावांची खेळी केली. या खेळीसह भारतीय संघाने २५५ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी ३९९ धावा करायच्या आहेत.

जेव्हापासून गिलने तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हापासून हे त्याचं पहिलंच शतक आहे. गेल्या १३ डावात त्याला ५० धावांचा आकडाही पार करता आला नव्हता. शतकांचा दुष्काळ संपल्यानंतर गिल जल्लोष करेल असं सर्वांनाच वाटलं होतं. मात्र तो शांतच राहिला. दरम्यान तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्याने यामागचं कारणही सांगितलं.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर गिल म्हणाला की, ' तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अतिशय महत्वाचं आणि दिलासा देणारं होतं. खूप बरं वाटतंय, कारण रोहित आणि यशस्वी बाद झाले होते. आमच्यासाठी धावा करणं आणि आघाडी घेणं अतिशय महत्वाचं होतं. (Cricket news in marathi)

गिलने वनडे आणि टी -२० क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला. मात्र कसोटीत त्याला सुर गवसला नव्हता. चांगली सुरुवात मिळाल्यानंतर तो विकेट टाकायचा. त्यामुळे त्याला संघाबाहेर करण्याची मागणी जोर धरू लागली होती. दरम्यान दुसऱ्या कसोटीत शतक झळकावत त्याने टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

पुढे बोलताना तो म्हणाला की, ' मला वाटत होतं की, माझं संघासाठी अजूनही काम झालेलं नाही. त्यामुळेच मी जल्लोष साजरा केला नाही. मी एका वेळी एकाच चेंडूवर लक्ष केंद्रित करत होतो. खेळपट्टीवर खूप काही होत होतं. सुरुवातीला २ फलंदाज लवकर बाद झाले होते. त्यानंतर माझ्यात आणि श्रेयस अय्यरमध्ये महत्वपूर्ण भागीदारी झाली.'

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

Astrology: आजपासून 'या' राशींचे दिवस चमकणार, शनीची साडीसती संपणार

SCROLL FOR NEXT