भारतीय संघातील युवा फलंदाज शुभमन गिलचा फ्लॉप शो सुरुच आहे. विशाखापट्टनमच्या मैदानावर सुरु असलेल्या सामन्यातील पहिल्या डावात शुभमन गिल अवघ्या ३४ धावा करत माघारी परतला आहे.
तो अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर बाद होऊन माघारी परतला आहे. पहिल्या कसोटीत फ्लॉप ठरल्यानंतर असं म्हटलं जात होतं की, दुसऱ्या कसोटीत तो कमबॅक करेल, मात्र असं काहीच झालं नाही. त्याचा फ्लॉप शो पाहून, त्याला संघाबाहेर करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
हैदराबाद कसोटीतील पहिल्या डावात शुभमन गिल अवघ्या २३ धावा करत माघारी परतला होता. टॉम हार्टलेने त्याला पॅव्हेलियनची वाट दाखवली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याला खातं उघडण्याचीही संधी मिळाली नव्हती. तो वनडेत हिट ठरतोय, टी-२० क्रिकेटमध्ये हिट ठरतोय. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये त्याची गाडी रुळावरुन उतरली आहे.
गिलची आकडेवारी पाहिली तर त्याने २२ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. यादरम्यान त्याने २९.६५ च्या सरासरीने १०९७ धावा केल्या आहेत. ज्यात २ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे.
वनडे- टी-२० क्रिकेटमध्ये सुपरहिट..
कसोटी क्रिकेटमध्ये फ्लॉप ठरत असला तरीदेखील त्याने वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याचा वनडे क्रिकेटमधील रेकॉर्ड पाहिला तर त्याने ४४ वनडे सामन्यांमध्ये १०३.४६ च्या स्ट्राईक रेटने २२७१ धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या नावे ६ शतकं झळकावण्याची नोंद आहे. तर १३ अर्धशतकांची नोंद आहे. (Cricket news in marathi)
गिलचा टी-२० क्रिकेटमधील रेकॉर्ड पाहिला तर त्याने १४ सामन्यांमध्ये १४७.५८ च्या स्ट्राईक रेट आणि २५.७७ च्या सरसरीने ३३५ धावा केल्या आहेत. ही आकडेवारी जर पाहिली तर स्पष्ट दिसून येतं की, तो मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये सुपरहिट ठरला आहे. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये संघर्ष करताना दिसून येत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.