India Vs England 2nd Test x
Sports

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

India Vs England 2nd Test : भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसरा सामन्यातील शेवटचा दिवस सुरु आहे. या सामन्याला सुरुवात झाली आहे. पावसामुळे हा सामना दोन तास उशिराने सुरु झाला.

Yash Shirke

Ind Vs Eng कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा आज पाचवा दिवस आहे. पावसामुळे सामना काही काळासाठी पुढे ढकलण्यात आला. बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन स्टेडियमवर आता थोड्याच वेळात सामना सुरु होणार आहे. पहिल्या सत्राला ५.१० वाजता सुरुवात होणार असून सामना ११.३० वाजता संपेल अशी माहिती समोर आली आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या सामन्याच्या सुरुवातीला पाऊस पडला. त्यानंतर ५.१० वाजता सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली. कसोटी सामन्यातील पहिले सत्र ५.१० ते ७.००, दुसरे सत्र ७.४० ते ९.४० आणि तिसरे सत्र १०.०० ते ११.३० या दरम्यान होणार आहेत. पावसामुळे सामन्याला विलंब होत असल्याचा फायदा इंग्लंडला होऊ शकतो असे म्हटले जात आहे.

चौथ्या दिवसाच्या शेवटी भारताने इंग्लंडसमोर ६०८ धावांचे आव्हान ठेवले. त्यानंतर इंग्लंडने ७२ धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराजने १ आणि आकाश दीपने २ अशा एकूण ३ विकेट्स घेतल्या. पाचव्या दिवशी पावसामुळे सामना सुरु व्हायला उशीर झाला आहे. पावसामुळे सामना ड्रॉ होण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट फायदा इंग्लंडला होईल. आता जर भारताने इंग्लंडला ऑलआउट केले, तरच भारतीय संघ हा कसोटी सामना जिंकेल.

१९६९ मध्ये एजबॅस्टन स्टेडियमवर टीम इंडियाने पहिला कसोटी सामना खेळला होता. तेव्हापासून आजपर्यंत ५८ वर्षात या मैदानावर भारताने एकही सामना जिंकलेला नाही. आतापर्यंत एजबॅस्टन स्टेडियमवर भारताने एकूण ८ सामने खेळले आहेत. यातील ७ सामन्यात भारताचा पराभव झाला आहे, तर एक सामना ड्रॉ राहिला. तेव्हा एजबॅस्टन स्टेडियमवर सामना जिंकून गिलसेनेला इतिहास रचण्याची संधी आहे. पण पावसामुळे सामना ड्रॉ होणार तर नाही ना अशी भीती भारतीय चाहत्यांना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभा असलेल्या भाविकाला सुरक्षा रक्षकाची काठीने बेदम मारहाण

Morning Tips: अंथरूणातून उठल्यानंतर या सवयी पाळा, भविष्यात होईल फायदा

WTC Points Table: भारताच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; पाहा भारत कोणत्या स्थानावर?

Eye Infection: पावसाळ्यात डोळ्यांना संसर्ग होण्यापासून सुरक्षित ठेवा, जाणून घ्या महत्वाच्या सोप्या टिप्स

Ladki Bahin Yojana: वेळेवर ₹१५०० मिळत नाहीत, लाडकी बहीण योजना बंद करा, राज्यातील महिलांची मागणी

SCROLL FOR NEXT