Jasprit Bumrah ANI
Sports

IND vs ENG: बुमराहच्या यॉर्करने उडवली पोपची झोप; दुसऱ्या कसोटी सामन्यात बुडाल्या ऑलीच्या होप्स

IND vs ENG Jasprit Bumrah : विशाखापट्टणम येथे होत असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी दमदार कामिगरी केली. जसप्रीत बुमराहनेही या सामन्यात जो रूटची विकेट घेत एक विक्रम आपल्या नावावर केला. बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही १२ वेळा जो रूटला बाद केले. तर बुमराहने १० कसोटी डावात ५व्यांदा ऑली पोपला आपला बळी बनवले आहे.

Bharat Jadhav

Jasprit Bumrah Yorker:

विशाखापट्टणम येथे होत असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी दमदार कामिगरी केली. पहिल्या डावात भारताने ३९६ धावा केल्या. यशस्वी जयस्वालने २०९ धावांची खेळी केली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली. यावेळी जसप्रीत बुमराह त्याच्या जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने इंग्लंडच्या ४ फलंदाजांना बळी बनवले आहे. बुमराहच्या ४ विकेटपैकी ऑली पोपची विकेट पाहण्यासारखी होती. बुमराहच्या घातक यॉर्करनं ऑली पोपची झोप उडवली. पोपच्या विकेटमुळे इंग्लंडच्या होप्स देखील बुडाल्या. (Latest News)

बुमराहच्या चेंडूने ऑली पोपच्या पायाचा नेम घेत त्रिफळा उडवला. बुमराहचा यॉर्कर इतका जबरदस्त होता की पोपला काही कळण्याआधी चेंडूने त्रिफळा उडवला होता. पोपने हैदराबाद कसोटी सामन्यात शतक ठेकलं होतं. त्याच्या या शतकी खेळीमुळे इंग्लंडने कसोटी सामना जिंकला होता. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहच्या यॉर्करने त्याचा बळी घेतला. यावेळी ऑली पोपला फक्त २३ धावा करता आल्या.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बुमराहने ५व्यांदा बळी घेतला

जसप्रीत बुमराहने १० कसोटी डावात ५व्यांदा ऑली पोपला आपला बळी बनवले आहे. ऑली पोपशिवाय बुमराहने इंग्लंडच्या पहिल्या डावात जो रूट, जॉनी बेअरस्टो, कर्णधार बेन स्टोक्स आणि टॉप हार्डली यांच्या विकेट घेतल्या आहेत. बुमराहने ३७ धावांत ५ विकेट्स घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये बुमराहाने १० वेळेस ५ विकेट घेतल्या आहेत. या डावात कुलदीप यादवने ३ बळी घेतले. मुकेश कुमार आणि आर अश्विनच्या खात्यात एकही विकेट गेली नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी अमरावतीत पावसाची दमदार हजेरी

माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षात उभी फूट; 20 खासदारांनी बनवला वेगळा गट, लोकसभा अध्यक्षांना दिलं पत्र

Chanakya Niti: या ५ कारणांमुळे नवरा बायकोत होतात वाद, वेळीच घ्या योग्य निर्णय नाहीतर...

Aali Lakhabai Song: रौद्र रूप, दमदार नृत्य अन् लोकसंगीताची जादू; अमृता धोंगडेचा 'आली लखाबाई' गाणं प्रदर्शित

Navi Mumbai : सलग ३-४ दिवस लाईट नसल्यानं महिलेचा आक्रोश; उशी - चादर घेऊन थेट महावितरणच्या ऑफिसमध्ये पोहोचली, VIDEO

SCROLL FOR NEXT