ओली पोपची १९६ धावांची चिवट खेळी, त्याला तळातील फलंदाजांची दिलेली उत्तम साथ आणि टीम इंडियाच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे हैदराबाद येथील पहिल्या कसोटी सामन्यावर इंग्लंडने मजबूत पकड बनवली.
दुसऱ्या डावात इंग्लंडने ४३६ धावांचा डोंगर उभारला. पहिल्या डावाच्या आधारे टीम इंडियाकडे १९० धावांची आघाडी होती. आता चौथ्या डावात भारताला विजयासाठी तब्बल २३१ धावांची गरज आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यामुळे हा सामना नेमका कोणत्या संघाकडे कलाटणी घेईल, याचा सध्यातरी अंदाज बांधणं कठीण आहे. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात २४६ धावांवर गारद झाला होता. त्यानंतर भारताने आपल्या पहिल्या डावात ४२० धावांचा डोंगर उभा केला.
भारताकडून (Team India) यशस्वी जायस्वाल, केएल राहुल आणि रवींद्र जडेजाने अर्धशतकी खेळी केली. इंग्लंडकडून जो रुटने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या होत्या. इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला असताना, भारताकडे तब्बल १९६ धावांची आघाडी होती.
जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन आश्विनने इंग्लडच्या (England Team) टॉप ऑर्डर फलंदाजांना झटपट माघारी पाठवत सामना भारताच्या दिशेने झुकवला होता. मात्र, ऑली पोपने संयमी खेळी करत भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लडने ६ बाद ३१६ अशी मजल मारता आली. चौथ्या दिवसाची सुरुवात होताच पोपने भारतीय गोलंदाजांवर पुन्हा आक्रमण केलं. त्याने २७८ चेंडूत १९६ धावांची खेळी केली.
भारतीय संघाच्या खराब क्षेत्ररक्षणाचा पोपने चांगलाच फायदा उचलला. पोपचे द्विशतक अवघ्या चार धावांनी हुकलं. त्याला बुमराहने बाद केलं. अखेर इंग्लंडचा दुसरा डाव ४३६ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन आश्विनने प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.
आता टीम इंडियाला हा कसोटी सामन्यासाठी चौथ्या डावात २३१ धावांची गरज आहे. अजूनही टीम इंडियाकडे सामन्यात विजय मिळवण्याची संधी आहे. मात्र, चौथ्या डावात फलंदाजी करणे सोपे नसणार आहे. त्यामुळे या सामन्यात नेमका कोणता संघ बाजी मारणार, याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.