IND vs ENG: Saam tv
Sports

IND vs ENG: पहिल्या कसोटीत कर्णधार शुबमन गिल Fail, ५ शतके ठोकूनही टीम इंडिया पराभूत, कसोटी मालिकेत इंग्लंडची 'लीड'

IND vs ENG Highlights: पहले पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा ५ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारताने एकूण ५ शतके ठोकली तरीही टीम इंडियाला अपयश आलं.

Bharat Jadhav

पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा ५ विकेट्सने पराभव केला. लीड्स कसोटीच्या चौथ्या डावात इंग्लंडला ३७१ धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी पाचव्या दिवशी ५ विकेट्स शिल्लक असताना पूर्ण केले. या सामन्यात भारतीय संघाकडून ५ शतकं करण्यात आली होती. रिषभ पंतनं दोन डावांमध्ये दोन शतकं झळकावली.

तर शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी एक-एक शतकं केली. तरीही टीम इंडियाचा लीड्सच्या मैदानात दारुण पराभव झाला. भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतलीय.

इंग्लंडने दुसरे सर्वोच्च लक्ष्य ठेवले आहे. इंग्लंडकडून फलंदाजी करताना जो रूटने ५३ आणि जेमी स्मिथने ४४ धावा करत इंग्लंडला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. दोघांनीही सहाव्या विकेटसाठी ७१ धावांची अखंड भागीदारी केली. कर्णधार बेन स्टोक्सने संघासाठी ३३ धावांचे योगदान दिलं. इंग्लंडने दिवसाची सुरुवात २१ धावांपासून केली.

पहिल्या सत्रात इंग्लंडने एकही विकेट गमावली नाही. सलामीवीर बेन डकेट (१४९) आणि जॅक क्रॉली (६५) धावा करत दोघांनी १८८ धावांची भर घातली. दुसऱ्या सत्रात भारतीय संघानं कमबॅक केलं आणि धडाधड अशा विकेट्स घेतल्या. दुसऱ्या सत्रात भारताने हॅरी ब्रुकला शुन्यावर, बेन डकेट (१४९), ऑली पोप (८) आणि झॅक क्रॉली (६५) धावांवर बाद केलं.

पण इंग्लंडच्या संघानं आत्मविश्वास न गमावता सामन्यात पुन्हा एकदा वर्चस्व केलं आणि विजय मिळवला. भारताकडून शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली.

नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडने टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यशस्वी जयस्वालने १०१ धावांची खेळी केली, तर केएल राहुल ४२ धावा करून बाद झाला. साई सुदर्शन त्याच्या कसोटी पदार्पणात शून्यावर बाद झाला. कर्णधारपदाच्या पदार्पणात शुबमन गिलने १४७ धावांची खेळी केली, तर ऋषभ पंतनेही १३४ धावांचे योगदान दिले. या तीन शतकांमुळे टीम इंडिया ४७१ धावांपर्यंत पोहोचू शकली. भारताचे शेवटचे ६ फलंदाज पहिल्या डावात फ्लॉप ठरले होते.

पहिल्या डावात इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी आला तेव्हा पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराहने जॅक क्रॉलीला बाद केले. पण बेन डकेटच्या ६२ धावा आणि ऑली पोपच्या १०६ धावांच्या जोरावर इंग्लंडने पुनरागमन केले. हॅरी ब्रुकनेही चांगली फंलदाजी केली. पण प्रसिद्ध कृष्णाने त्याला ९९ धावांवर बाद केलं. इंग्लंडने २७६ धावसंख्येवर ५ विकेट गमावल्या होत्या, त्यामुळे त्यांना ४०० धावा करणेही कठीण वाटत होते.

पण जेमी स्मिथच्या ४० धावा आणि ख्रिस वोक्सच्या ३८ धावांमुळे इंग्लंड ४६५ धावांपर्यंत पोहोचला. तर भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने ५ विकेट्स घेतल्या, तरीही भारताला फक्त ६ धावांची आघाडी घेता आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

SCROLL FOR NEXT