IND vs ENG 1st Test Day 4 Saam tv
Sports

IND vs ENG 1st Test Day 4: इंग्लंडचं बॅझबॉल पडलं टीम इंडियावर भारी, रोहितच्या सेनेने मालिकेचा पहिला कसोटी सामना गमावला

IND vs ENG 1st Test Day 4: इंग्लंड विरुद्ध भारतामध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिलाच सामना भारताना गमावला. इंग्लंडची बॅझबॉल खेळी टीम इंडियावर चांगलीच भारी पडली.

Vishal Gangurde

IND vs ENG 1st Test :

इंग्लंड आणि भारतामध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिलाच सामना भारताना अवघ्या २८ धावांनी सामना गमावला आहे. इंग्लंडची बॅझबॉल खेळी टीम इंडियावर चांगलीच भारी पडली. पाचवा दिवस होण्याआधीच टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. (Latest Marathi News)

इंग्लंडने भारताला २३१ धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची चांगलीच पडझड झाली. सुरुवातीलाच यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल बाद झाले. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा ३९ धावांवर बाद झाला. तर चौथा धक्का अक्षर पटेलच्या रुपात बसला. पुढे केएल राहुलही लवकर बाद झाला. केएल राहुल २२ धावांवर बाद झाला. तर रविंद्र जाडेजा २ धावांवर बाद झाला. तर त्यानंतर इतरही फलंदाजही बाद झाले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टॉम हार्टली पडला टीम इंडियावर भारी

इंग्लंडने भारताला २३१ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र, टीम इंडिया या आव्हानाचा पाठलाग करताना २०२ धावांवर गारद झाली. इंग्लंडने २८ धावांनी सामना जिंकला. मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात टॉम हार्टलीने जबरदस्त खेळ दाखवला.

टॉमने दुसऱ्या डावात ७ गडी बाद केले. टॉमने यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, कर्णधार रोहित शर्मा, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन या फलंदाजांना बाद केलं.

दुसऱ्या डावात इंग्लंडच्या चारशे पार धावा

दुसऱ्या डावात इंग्लंडने फलंदाजी करताना ४२० धावा केल्या. चारशे धावा पार करण्यासाठी ओली पोपने १९६ धावांची खेळी खेळली. ओलीचं टेस्ट करिअरमधील दुसरं दुहेरी शतक थोडक्यात हुकलं. तर भारतासाठी जसप्रीत बुमराहने ४ गडी बाद केले. तर आश्विनने ३, जडेजा २, अक्षर पटेलने १ गडी बाद केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT