team india twitter
Sports

IND vs ENG 1st Test: हैदराबाद कसोटीचा पहिला दिवस टीम इंडियाने गाजवला! गोलंदाजांनतर फलंदाजही चमकले

India vs England 1st Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या मैदानावर सुरु आहे.

Ankush Dhavre

India vs England 1st Test 1st Innings:

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कसोटी सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियवर सुरु आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी दमदार सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले आहे.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान भारतीय गोलंदाजांच्या धारदार गोलंदाजीसमोर इंग्लंडचा डाव २४६ धावांवर संपुष्टात आला. या धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या डावात आतापर्यंत १ गडी बाद ११९ धावा केल्या आहेत.

भारतीय संघाची आक्रमक सुरुवात..

पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने देखील दमदार सुरुवात केली. भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी मैदानावर आली होती. दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच हल्लाबोल करायला सुरुवात केली.

दोघांनी मिळून हार्टलेच्या गोलंदाजीवर ९ षटकात ६३ धावा कुटल्या. रोहित शर्मा २४ धावा करत माघारी परतला. मात्र यशस्वीने एक बाजू धरुन ठेवली. यशस्वी जयस्वाल ७० चेंडूंचा सामना करत ७६ धावांवर नाबाद आहे. भारतीय संघाने पहिल्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत ११९ धावा केल्या आहेत. (Latest sports updates)

इंग्लंडचा डाव २४६ धावांवर संपुष्टात..

इंग्लंडचा बॅझबॉल या डावात कामी आला नाही. कारण इंग्लंडला या डावात मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. इंग्लंडकडून फलंदाजी करताना बेन स्टोक्सने सर्वाधिक ७० धावांची तुफानी खेळी केली. तर बेन डकेटने ३५, जॉनी बेअरस्टोने ३७, जो रुटने २९ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Shooting Case: टायगरवरील गोळीबार प्रकरण; मास्टरमाईंड अनिल पंडितच्या भावजयीला अटक, आरोपींची संख्या १३ वर

MLC Election: भाजपमध्ये गेलेल्या २ अपक्ष नेत्यांची आमदारकी जाणार; काय आहे नियम? PK च्या पक्षाकडून तक्रारीनंतर चर्चेला उधाण

Weight Loss Diet Tips: वजन कमी करण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे जाणून घ्या

‘५०० कोटीनंतर आणखी ४ बॉम्ब टाकणार’; अनेकांची नावं उघड करणार,मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

5 Crispy Chakli Recipe For Diwali: दिवाळीसाठी बनवा ५ प्रकारच्या खमंग आणि कुरकुरीत चकल्या! वाचा सोप्या रेसिपीज

SCROLL FOR NEXT