Ind Vs Eng Test  x
Sports

Ind Vs Eng Test : करुण नायर 8 वर्षांनी परतला, एक नवा चेहराही आला; कशी आहे भारताची Playing XI?

India Vs England : भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. इंग्लंडच्या कर्णधाराने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टॉसनंतर दोन्ही संघांच्या प्लेईंग ११ ची घोषणा झाली आहे.

Yash Shirke

Ind Vs Eng 1st Test Match : भारत विरुद्ध इंग्लंड या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जाणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारताचा संघ बलाढ्य इंग्लंडला भिडणार आहे. भारताच्या संघात अनेक युवा खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत भारताचा संघ कशी कामगिरी करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इंग्लंडच्या लीड्समधील हेडिंग्ले येथे भारत विरुद्ध इंग्लंडचा पहिला कसोटी सामना रंगणार आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. टॉस झाल्यानंतर दोन्ही संघांच्या अकरा शिलेदारांची घोषणा करण्यात आली.

भारताची प्लेईंग ११ -

यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), रिषभ पंत, करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज

इंग्लंडची प्लेइंग ११ -

झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जॅमी स्मिथ, ख्रिस वोक्स, ब्रेडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातून साई सुदर्शनने कसोटी फॉरमॅटमध्ये पदार्पण केले आहे. केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल सलामीला उतरणार आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर साई सुदर्शन उतरणार आहे. चौथ्या क्रमावर शुभमन गिल फलंदाजी करताना दिसणार आहे. करुण नायर सहाव्या क्रमांकावर खेळणार असल्याचे म्हटले जात आहे.

मालिका सुरु होण्यापूर्वी ट्रॉफीचे नाव बदलण्यात आले आहे. पूर्वी भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेला पतौडी ट्रॉफी म्हटले जात होते. हे नाव बदलून कसोटी मालिकेच्या ट्रॉफीला सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन या दोन दिग्गज खेळाडूंची नावे देण्यात आली आहे. ही ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी म्हणून ओळखली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trump Putin Summit : भारतावरचा टॅरिफ रद्द होणार? ट्रम्प-पुतीन भेटीत काय घडलं?

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवात ७५ गोविंदा जखमी, काहींची प्रकृती गंभीर, एकाचा मृत्यू

Dog Bite: दिसेल त्याचे तोडले लचके;इंदापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ,सीसीटीव्हीत घटना कैद

Maharashtra Politics : ठाण्याच्या वर्चस्वावरुन महायुतीत मतभेद, एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात पुन्हा संघर्ष

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात फक्त मराठी चालणार; मुंबईत दहीहंडी उत्सवात मनसेचे बॅनर झळकले

SCROLL FOR NEXT