team india twitter
Sports

IND vs ENG Record: इंग्लंडला नमवताच टीम इंडियाने रचला इतिहास! असा रेकॉर्ड करणारा ठरला दुसराच संघ

Team India Record: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने मोठ्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे.

Ankush Dhavre

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडला. हा सामना भारतीय संघाने ७ गडी राखून आपल्या नावावर केला. या शानदार विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. यादरम्यान भारतीय संघाच्या नावे एका खास रेकॉर्डची नोंद झाली आहे.

भारतीय संघाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

इंग्लंडला धूळ चारताच भारतीय संघाने इतिहास रचला आहे. भारताने कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळताना सलग सातवा विजय मिळवला आहे. यासह आयसीसीघ्या फुल मेंबर संघांमध्ये एकाच मैदानावर खेळताना सलग सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आहे. या मोठ्या रेकॉर्डमध्ये भारताने पाकिस्तानची बरोबरी केली आहे. यापूर्वी २००८ ते २०२१ पर्यंत पाकिस्तानने कराचीच्या मैदानावर खेळताना सलग ७ सामने जिंकले होते.

इंग्लंडचा संघ या यादीत अव्वल स्थानी आहे. या संघाने २००७ पासून ते २०२१ पर्यंत कार्डिफमध्ये खेळताना सलग ८ सामने जिंकले. आता भारतीय संघाकडे हा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडकडून एकटा जोस बटलर चमकला.

त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने इंग्लंडची धावसंख्या १३२ वर पोहोचवली. भारताकडून धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या अभिषेक शर्माने वादळी अर्धशतकी खेळी केली आणि भारताला ७ गडी राखून विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

'मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय!; ओमराजे निंबाळकरांनी सांगितली ठाकरे गट सोडण्याची कारणं

NEET Student: 'मला माफ करा...' नीटच्या आणखी एका विद्यार्थिनीची आत्महत्या, मृतदेह पाहून कुटुंबीय हादरले

Chhatrapati Sambhajinagar : पावसाळ्यातील स्वर्ग! 200 फूट उंचीवरून कोसळणारा संभाजीनगरचा धबधबा पर्यटकांना घालतो भुरळ

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार,अधिवेशनात 10 विधेयके मांडणार: मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT