harshit rana twitter
Sports

IND vs BAN: IPL गाजवणाऱ्या Harshit Ranaला टीम इंडियात संधी का मिळत नाहीये? समोर आलं मोठं कारण

Harshit Rana, Team India: आयपीएल २०२४ स्पर्धेत शानदार गोलंदाजी करणाऱ्या हर्षित राणाला भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये स्थान का दिलं जात नाहीये? जाणून घ्या.

Ankush Dhavre

Harshit Rana, India vs Bangladesh: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. आतापर्यंत या दोन्ही संघांमध्ये २ टी-२० सामने खेळले गेले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने शानदार कामगिरी करत विजय मिळवला आणि २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.

या मालिकेतील पहिल्याच सामन्यात मयांक यादव आणि नितीश कुमार रेड्डी यांना पदार्पणाची संधी दिली गेली होती. मात्र हर्षित राणाला अजूनही पदार्पणाची संधी दिली जात नाहीये. काय आहे कारण? जाणून घ्या.

संधी न मिळण्याचं नेमकं कारण काय?

बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे. ज्यात मयांक यादव, हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी यांचा समावेश आहे.

मालिकेतील पहिल्याच सामन्यात नितीश कुमार रेड्डी आणि मयांक यादवला पदार्पण करण्याची संधी दिली गेली. मात्र सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये हर्षित राणाला पदार्पणाची संधी देण्यात आलेली नाही.

मयांक यादवने मिळालेल्या संधीचं सोनं करत शानदार गोलंदाजी केली आहे. अर्शदीप सिंग संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. यासह नितीश कुमार रेड्डी आणि हार्दिक पंड्या देखील गोंलदाजीत मोलाचं योगदान देत आहे. त्यामुळे हर्षित राणाला पदार्पण करण्याची संधी मिळत नाहीये.

आयपीएल २०२४ स्पर्धेत दमदार कामगिरी

हर्षित राणाने आयपीएल २०२४ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या संघाकडून खेळताना त्याने शानदार गोलंदाजी केली होती. त्याने १३ सामन्यांमध्ये ९.०८ च्या इकॉनॉमीने १९ गडी बाद केले होते. या शानदार कामगिरीच्या बळावर त्याला भारतीय संघात स्थान देण्याची मागणी जोर धरु लागली होती. दरम्यान तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याला भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते.

हर्षित राणाला भारतीय संघात स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेसाठीही त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं. मात्र त्याला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर आता बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतही त्याला संधी देण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT