India Vs Bangladesh, Kuldeep Yadav Saam Tv
Sports

Ind vs Ban : मागच्या कसोटी विजयाचा 'हिरो' ठरलेल्या कुलदीप यादवला काढलं; सुनील गावसकर भडकले

Kuldeep Yadav : केएल राहुल यानं पहिल्या कसोटी सामन्यातील 'हिरो' कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केलं.

Nandkumar Joshi

India Vs Bangladesh, Kuldeep Yadav : ढाका येथे भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल झाला आहे. या बदलामुळं क्रिकेट विश्वालाच आश्चर्याचा धक्का बसलाय. केएल राहुल यानं पहिल्या कसोटी सामन्यातील 'हिरो' कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केलं.

विशेष म्हणजे मागच्या सामन्यात तो प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता आणि त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. टीम इंडियाच्या या निर्णयानं माजी कर्णधार सुनील गावसकर हैराण झाले आहेत. मागील सामन्यातील बेस्ट प्लेअरला संघातून डच्चू कसा दिला जाऊ शकतो? असा सवाल त्यांनी केला आहे. (Latest Marathi News)

कुलदीप यादवला संघाबाहेर केल्यानंतर सुनील गावसकर यांनी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कशी बोलताना संताप व्यक्त केला आहे. प्लेअर ऑफ द मॅच असलेल्या गोलंदाजाला संघातून बाहेर करणं अविश्वसनीय आहे. हा खरंच खूप तोकडा शब्द आहे. यापेक्षा जास्त कटू शब्द वापरू इच्छितो. ज्या खेळाडूनं मागच्या सामन्यात २० पैकी आठ खेळाडू बाद केले, अशा खेळाडूला तुम्ही संघाबाहेर ठेवलंय. संघात आणखी दोन फिरकीपटू होते. त्यांच्यापैकी एकाला ड्रॉप करू शकत होते. काहीही असो कुलदीपला खेळवायला हवं होतं, असंही सुनील गावसकर म्हणाले. (Bangladesh)

सुनील गावसकरच नव्हे तर, इतर माजी क्रिकेटपटू आणि त्याच्या चाहत्यांनीही कुलदीप यादवचा दुसऱ्या कसोटी सामन्यात संघातून वगळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. माजी क्रिकेटपटू डोडा गणेश यानं ट्विट केलंय. कुलदीप यादवसोबत असं नेहमी का होतंय? त्याच्यासोबत असं वारंवार करू शकत नाहीत. प्लीज, कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर द्या आणि निराश होऊ नकोस असं सांगावं. कुलदीप यादव होणं खरंच कठीण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

SCROLL FOR NEXT