r ashwin twitter
Sports

IND vs BAN, 1st Test: चेन्नईत लोकल बॉयची हवा... R Ashwin ने झळकावले खणखणीत शतक अन् जड्डूसोबत विक्रमी भागीदारी

R Ashwin Century: भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीत आर अश्विनने शानदार शतकी खेळी केली आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघ अडचणीत असताना आर अश्विन आणि रविंद्र जडेजा या जोडीने भारताला संकटातून बाहेर काढलं आहे. बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत १४४ धावांवर भारताचे ६ फलंदाज तंबूत परतले होते.

त्यानंतर रविंद्र जडेजा आणि आर अश्विनची जोडी मैदानावर चांगलीच जमली. एकवेळ अशी होती, जेव्हा भारतीय संघाला २०० धावांपर्यंत पोहचणंही कठीण झालं होतं. मात्र या दोघांनी १५० धावांची भागिदारी केली. दरम्यान चेन्नईचा लोकल बॉय आर अश्विनने आपलं शतक पूर्ण केलं.

आर अश्विनचं शतक

भारतीय संघ जेव्हा जेव्हा अडचणीत सापडला आहे, तेव्हा तेव्हा आर अश्विन भारतीय संघाच्या मदतीला धावला आहे. कसोटीत गोलंदाजी करताना आर अश्विन नेहमीच हिट ठरतो. मात्र यावेळी त्याने फलंदाजीत बांगलादेशी गोलंदाजांना घाम फोडला आहे. ज्या खेळपट्टीवर शुभमन गिलला खातंही उघडता आलं नाही. त्याच खेळपट्टीवर अश्विनने आपल्या कारकिर्दीतील दुसरं वेगवान अर्धशतक झळकावलं. त्यानंतरही त्याने ही शानदार खेळी सुरु ठेवली.

हे आर अश्विनच्या कसोटी कारकिर्दीतील ६ वे शतक ठरले आहे. यापूर्वी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५ शतक आणि १४ अर्धशतक झळकावली आहेत. या सामन्यात फलंदाजीला येण्यापूर्वी आर अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीत ६१४४ धावा केल्या होत्या.

अश्विन जडेजाच्या जोडीने रचला इतिहास

या दोघांनी मिळून ५० हून अधिक धावांची भागीदारी केली. यासह दोघांच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. या जोडीने सातव्या विकेटसाठी भागीदारी करताना सर्वाधिक धावा केल्या आहेत. या यादीत दोघेही दुसऱ्या स्थानी पोहोचले आहेत. या यादीत कपिल देव आणि सय्यद किरमानी यांची जोडी अव्वल स्थानी आहे. दोघांनी मिळून ६१७ धावा जोडल्या होत्या. आता जडेजा आणि अश्विनने मिळून ५०० पेक्षा अधिक धावा जोडल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीत भर पावसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

Video : तेरे जैसा यार... दंडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून गाणं गाणे भोवलं! तहसीलदाराचे निलंबन

GST : छत्र्या, मोबाइल, कपडे ते सायकल, सिमेंट होणार स्वस्त, वाचा केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी थेट दिल्लीत आंदोलन, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

SCROLL FOR NEXT