team india  twitter
क्रीडा

Ind vs Aus WTC Final Day 1 Live: सिराज,शार्दुलची दमदार सुरुवात अन् वॉर्नरची झुंजार खेळी, पहिल्या सत्रात दोन्ही संघ बरोबरीत

Ankush Dhavre

IND VS AUS WTC FINAL: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना लंडनमधील द ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकुन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या सामन्यातील पहिल्या दिवसातील पहिल्या सत्रात दोन्ही संघातील खेळाडूंनी बरोबरीचा खेळ केल्याचे पाहायला मिळाले आहे.

मोहम्मद सिराजने मिळवुन दिली पहिली विकेट..

या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकुन ऑस्ट्रेलिया संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिलं होतं. दरम्यान भारतीय गोलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. भारतीय संघाकडुन मोहम्मद सिराजने भारतीय संघाला पहिली विकेट मिळवुन दिली.

त्याने आक्रमक फलंदाज उस्मान ख्वाजाला खातं ही न खोलु देता माघारी धाडले. त्यानंतर शार्दुलने ऑस्ट्रेलियाला दुसरा मोठा धक्का दिला.

त्याने डेव्हिड वॉर्नरला ४३ धावांवर बाद करत माघारी धाडले. पहिल्या सत्राच्या समाप्तीपर्यंत ऑस्ट्रेलियाने २३ षटक अखेर २ गडी बाद ७३ धावा केल्या आहेत.

भारतीय संघाकडुन मोहम्मद सिराजने ६ षटके गोलंदाजी केली यादरम्यान त्याने १६ धावा खर्च करत १ विकेट घेतला आहे. तर शार्दुल ठाकुरने ५ षटक गोलंदाजी करत १६ धावा खर्च करत १ विकेट घेतला आहे. (Latest sports updates)

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११ :

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, उमेश यादव,शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी,

ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, नॅथन लियॉन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क,

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi : अरबाज-निक्कीच्या जोडीने पुन्हा मारली बाजी; प्रतिस्पर्धी सलग दुसऱ्यांदा बॅकफुटवर; नेमकं काय घडलं?

Nashik News : नाशिकमध्ये ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी; आजपासून १५ दिवस मनाई आदेश, काय आहे कारण?

Vivo V40e चा धमाका; लॉन्चच्या आधीच किंमत आणि फीचर्सबाबत मोठी अपडेट आली समोर

Viral Video : भरवर्गात विद्यार्थ्यांची हाणामारी, आवाज ऐकताच शिक्षिका आली धावत; पुढे काय घडलं? तुम्हीच पाहा

Mumbai News: धक्कादायक! वांद्रे वरळी सी-लिंकवरून उडी मारुन कॅब चालकाची आत्महत्या; कारण काय?

SCROLL FOR NEXT