IND vs AUS WTC Final 2023, Virat Kohli SAAM TV
Sports

Virat Kohli News : विराट कोहलीच्या त्या एका कृतीनं हृदय जिंकलं; तुम्हीही म्हणाल, जिंकलंस भावा!

IND vs AUS WTC Final 2023 : ओव्हलच्या मैदानावरील विराट कोहलीच्या एका कृतीने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली.

Nandkumar Joshi

Virat Kohli Heart Touching Video : इंग्लंडमधील ओव्हलच्या मैदानावर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघांमध्ये होत आहे. या दोन्ही संघांमधील अंतिम लढतीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियानं भारतावर वर्चस्व गाजवले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या ३ बाद ३२७ धावा झाल्या होत्या. याचदरम्यान विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ओव्हलच्या मैदानावर खेळवला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच पहिला झटका बसला. तीन फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर ट्रॅविस हेड आणि स्मिथने सावध फलंदाजी केली आणि डाव सावरला. त्यानंतर दोघांनी वेगाने धावा केल्या. हेडने शतक झळकावल्यानंतर भारताच्या विराट कोहलीने खेळभावनेचे दर्शन क्रीडाप्रेमींना घडवले.

विराटच्या कृतीनं हृदय जिंकलं

WTC च्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा ट्रॅविस हेड पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. हेड फलंदाजीसाठी मैदानात आला त्यावेळी संघ पुरता संकटात सापडला होता. मात्र, त्याने बहारदार फटकेबाजी करत संघाला सावरलं. त्याने अवघ्या १०६ चेंडूंत शतक झळकावलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी हेड हा १४६ धावांवर नाबाद होता.

या सामन्यात विराटचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शतकी खेळी करणाऱ्या हेडकडे विराट कोहली जातो आणि त्याच्याशी हस्तांदोलन करून त्याला शुभेच्छा देत आहे. विराट कोहलीच्या या कृतीने अवघ्या भारतीयांना त्याच्यातील खेळभावनेचे दर्शन घडले.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी हेड आणि स्मिथ मैदानाबाहेर जात होते. त्यावेळी विराट कोहलीने हेडशी हस्तांदोलन केले. तसेच त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि त्याचे अभिनंदन केले. विराटचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

SCROLL FOR NEXT