team india saam tv news
Sports

World Cup Final 2023: 'वर्ल्डकप टीम इंडियाच जिंकणार,पण...' फायनलपूर्वी रवी शास्त्रींचा मोठा दावा

India vs Australia, World Cup Final 2023: या सामन्यापूर्वी रवी शास्त्री यांनी मोठा दावा

Ankush Dhavre

Ravi Shastri Statement:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

भारतीय संघ चौथ्यांदा वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ आठव्यांदाा वर्ल्डकपची फायनल खेळणार आहे. ही स्पर्धा भारतात होत असल्याने भारतीय संघाला विजयासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

रवी शास्त्री यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की,'मला असं वाटतं की सुरुवातीचे १० षटक अतिशय महत्वाचे असणार आहे. भारतीय संघाला आतापर्यंत चांगली सुरुवात मिळाली आहे. मुख्यत: रोहितने टॉप ऑर्डरमध्ये दमदार खेळ केला आहे. या सुरुवातीमुळे खूप फरक पडतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यातही अशी सुरुवात मिळाली तर नक्कीच त्याचा आत्मविश्वास वाढेल. डेव्हिड वॉर्नर,ट्रेविस हेड आणि मिचेल मार्श हे खतरनाक खेळाडू आहेत.'

तसेच तो पुढे म्हणाला की, 'विराट सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. तो आपली स्क्रिप्ट स्वत:च लिहतोय. तर त्याने आगामी सामन्यात आणखी एक शतक झळकावलं तर ही आश्चर्याची बाब नसेल. त्याने सेमीफायनलच्या सामन्यातही अशी कामगिरी करुन दाखवली आहे, आता फायनलमध्येही तो अशी कामगिरी करु शकतो. फायनलपेक्षा मोठं दुसरं काहीच नाही.' (Latest sports updates)

राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक होण्यापूर्वी रवी शास्त्री भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यावेळी ही भारतीय संघाला वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.

याबाबत बोलताना ते म्हणाले की, ' ज्यावेळी मी मुख्यप्रशिक्षक होतो त्यावेळी ही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हा मला खूप वाईट होतं. त्यावेळी मी त्याला म्हटलं होतं,तुम्ही वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहात. वेळ येईल, लक्ष केंद्रित ठेवा. रोहित लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आहे. वर्ल्डकप जिंकल्याशिवाय त्याच्या कारकिर्दीचा शेवट योग्य नसेल. सहा ते सात खेळाडूंकडे वर्ल्डकप जिंकण्याची ही शेवटची संधी आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT