rahul dravid twitter
Sports

Rahul Dravid Statement: राहुल द्रविडने सांगितलं टीम इंडियाच्या पराभवाचं कारण! रोहितच्या कॅप्टनसीबाबत बोलताना म्हणाले ...

India vs Australia World Cup Final Match: या सामन्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्नविड यांनी पराभवाचं नेमकं कारण सांगितलं आहे.

Ankush Dhavre

Rahul Dravid On Rohit Sharma:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा डाव २४० धावांवर रोखला.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. शेवटी ट्रेविस हेड आणि मार्नस लाबुशेनने महत्वपूर्ण खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. दरम्यान या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारतीय संघाची नेमकी चूक कुठे झाली याबाबत भाष्य केलं आहे.

या सामन्यानंतर बोलताना राहुल द्रविड म्हणाले की,'खेळपट्टी सुरुवातीला स्लो होती त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी अनुकूल झाली असं मला वाटतं. या खेळपट्टीवर २८० ते २९० धावा खूप झाल्या असत्या, २४० धावा इथे बचाव करण्यासाठी कमी होत्या. जर आम्ही ३० ते ४० धावा केल्या असत्या तर आम्ही ऑस्ट्रेलियावर दबाव टाकू शकलो असतो. दुसऱ्या डावात चेंडू बॅटवर चांगल्याप्रकारे येत होता त्यामुळे मला असं वाटतं की खेळपट्टी चांगली होती.'

रोहित शर्माचं कौतुक करताना राहुल द्रविड म्हणाले की,' तो एक महान कर्णधार आहे, त्याला कर्णधार म्हणून हा संघ बनवण्यासाठी वेळ आणि ऊर्जा वाया घालवली आहे. कुठलीही चर्चा करायची असेल तो नेहमी हजर असायचा. त्याने प्रत्येक सामन्यात आम्हाला चांगली सुरुवात करुन आणि नेहमी सकारात्मक राहिला. त्याने उत्तम फलंदाजी केली. मी एक माणूस आणि कर्णधार म्हणून त्याचं कौतुक करतो. त्याने उत्तमरित्या नेतृत्व करत संघाची जबाबदारी पार पाडली.' (Latest sports updates)

या विजयासह ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली आहे. भारतीय संघाला २००३ मध्ये झालेल्या वर्ल्डकप फायनलच्या पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी होती. मात्र भारतीय संघाकडून ही संधी हुकली आहे. भारतीय संघाला तिसऱ्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकण्याची होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT