team india saam tv news
Sports

World Cup 2023 Final: टीम इंडियाला माऊलीचा आशिर्वाद! वर्ल्डकप फायनलसाठी शमी अन् इशानच्या आईने दिल्या शुभेच्छा,Video

India vs Australia World Cup Final Match: या सामन्यासाठी भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या आईने भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Ankush Dhavre

World Cup 2023 Final:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा अंतिम सामन्याला प्रारंभ झाला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये या सामन्याचा थरार सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी मोहम्मद शमीच्या आईने शमी आणि भारतीय संघाला वर्ल्डकप सामन्यासाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत.

वर्ल्डकप स्पर्धेत शमीची दमदार गोलंदाजी....

मोहम्मद शमी हा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. तो आपल्या हवेत फिरणाऱ्या चेंडूंनी फलंदाजांची झोप उडवताना दिसून येत आहे. अवघ्या ६ सामन्यांमध्ये त्याने ९.१३ च्या दमदार सरासरीने २३ गडी बाद केले आहेत.

या स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी आहे. ६ सामन्यात त्याने ३ वेळा ५ गडी बाद करण्याचा तर १ वेळेस ४ गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे.

शमीच्या आईने दिल्या शुभेच्छा..

मोहम्मद शमीची आई अंजुम आरा यांनी ANI सोबत बोलताना म्हटलं की,'संपूर्ण भारतीय संघ माझ्या मुलासारखा आहे. भारतीय संघातील खेळाडू वर्ल्डकप जिंकून घरी आनंदाने घरी यावे, अशी मी देवाकडे प्रार्थना करते. देव मुंलाना विजयी करो आणि त्यांना आंनदाने घरी आणो..' (Latest sports updates)

मोहम्मद शमीच्या आईसह इशान किशनच्या आईने देखील वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्या म्हणाल्या की, ' मुलाला वर्ल्डकप खेळताना पाहून खूप आनंद होत आहे. त्याचं संघात खेळणं अथवा न खेळणं हे टीम मॅनेजमेंटवर अवलंबून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दोन व्यक्तींनी दिली १६० जागांची गॅरंटी, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा, मुख्यमंत्र्यांचा उलट सवाल

Home Vastu Tips: आर्थिक समृद्धीसाठी घरात कोणते वास्तु बदल करावेत?

Maharashtra Vande Bharat Express : महाराष्ट्रातून धावणार देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत, १० ठिकाणी थांबे अन् ११ तासांचा प्रवास, वाचा सविस्तर

वेब सिरिज पाहिली अन् सातवीच्या पोराने टोकाचे पाऊल उचलले, घरातच आयुष्य संपवलं

Maharashtra Live News Update: इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत - फडणवीस

SCROLL FOR NEXT