भारतीय संघाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत फायनलचं तिकीट मिळवलं. आता भारतीय फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे.
हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. जर या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवायचा असेल तर काही चुका टाळणं अतिशय महत्वाचं असणार आहे.
झटपट विकेट्स जाणं टाळावं लागेल...
वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारत फायनलचं तिकीट मिळवलं. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या दक्षिण आफ्रिकेला २१२ धावा करता आल्या.
अवघ्या १ धावसंख्येवर दक्षिण आफ्रिकेने पहिला विकेट गमावला. त्यानंतर विकेट्सची रांग लागली. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण डाव अवघ्या २१२ धावांवर संपुष्टात आला. हीच चूक भारतीय संघानेही केली तर फायनलमध्ये भारतीय संघाच्या अडचणी वाढू शकतात.
पार्ट टाईम गोलंदाजांचा योग्य वापर..
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिाका यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात पार्ट टाईम गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली होती. फलंदाजीत सेट झालेल्या हेनरीक क्लासेनला पार्ट टाईम गोलंदाज ट्रेविस हेडने बाद करत माघारी धाडले होते.
त्याने बॅक टू बॅक विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का दिला. त्यानंतर दुसऱ्या डावातही पार्ट टाईम गोलंदाज एडेन मार्करमने डेव्हिड वॉर्नरला बाद करत मोठा धक्का दिला. त्यामुळे भारतीय संघाला हा सामना जिंकायचा असेल तर पार्ट टाईम गोलंदाजांचा योग्य वापर करावा लागेल. (Latest sports updates)
अनफिट खेळाडू प्लेइंग ११ मधून बाहेर...
महत्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावूमा पूर्णपणे फिट नव्हता. तरीसुद्धा तो खेळण्यासाठी मैदानावर उतरला. परिणामी लवकर बाद होऊन माघारी परतला. हेच कारण होतं की, दक्षिण आफ्रिकेला चांगली सुरुवात करता आली नाही. महत्वाच्या सामन्यात टेम्बा बावूमाने संघासाठी मोठी खेळी करणं महत्वाचं होतं. आता फायनलमध्ये रोहितलाही महत्वपूर्ण खेळी करावी लागणार आहे.
आक्रमकतेवर नियंत्रण ठेवावं लागेल...
ऑस्ट्रेलियाला सेमीफायनल जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेने २१३ धावांचे आव्हान दिलं होतं. हे आव्हान तसं मोठं नव्हतं. मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी घाई केली आणि मोठे फटके खेळण्याच्या नादात मोठे फटके खेळले. परिणामी हा सामना ऑस्ट्रेलिाच्या हातून निसटणार होता. शेवटी पॅट कमिन्सने पुन्हा एकदा संयमी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
कॅच पकडा मॅच जिंका..
सेमीफायनलच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी ५ कॅच सोडल्य. या कॅच जर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी पकडल्या असत्या तर नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ फायनलचा सामना खेळले असते. भारतीय संघावर फायनलचा दबाव असेल मात्र जर वर्ल्ड चॅम्पियन बनायचं असेल तर भारतीय संघाला कठीण झेल सुद्धा पकडावे लागणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.