ODI World Cup Final IND vs AUS 2023: Saamtv
क्रीडा

IND vs AUS Weather: वर्ल्डकपच्या हायहोल्टेज सामन्यात पावसाचा खेळ? कसे असेल अहमदाबादचे हवामान अन् खेळपट्टी? वाचा...

Ahmedabad Weather Forecast: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या मुकाबल्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Gangappa Pujari

ODI World Cup Final IND vs AUS 2023:

करोडो भारतीयांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया विश्वविजयी होण्यासाठी सज्ज झालीय. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी दोन हात करेल.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या मुकाबल्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. या महत्वाच्या लढतीत पाऊस खेळ करणार का? कसे असेल अहमदाबादमधील आजचे हवामान? जाणून घ्या सविस्तर..

विश्वचषकाच्या अंतिम फेरीत (World Cup Final) आज (19 नोव्हेंबर) भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. दोन्ही संघांच्या नुकत्याच झालेल्या कामगिरीवर नजर टाकल्यास हा सामना ब्लॉकबस्टर ठरू शकतो. भारतीय संघ सलग 10 विजयांसह अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने मागील आठ सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्हीही तुल्यबळ संघ आमने- सामने येणार आहेत.

सामन्यावेळी कसे असेल हवामान?

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बाब म्हणजे सामन्यादरम्यान आकाश निरभ्र असेल. सामन्यावेळी पावसाची अजिबात शक्यता नाही. दुपारचे तापमान 32°C च्या आसपास असणे अपेक्षित आहे, हळूहळू सूर्यास्ताच्या वेळी तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. अहमदाबादमध्ये आर्द्रता सुमारे 33 टक्के असेल ती संध्याकाळनंतर अंदाजे 60 टक्क्यांपर्यंत पोहोचेल.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कशी असेल खेळपट्टी?

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा अंतिम सामना होत आहे. ही खेळपट्टी काळ्या मातीची आहे, जी फलंदाजीसाठी पोषक ठरेल. त्यामुळे आजच्या सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच गोल्ंदाजीमध्ये फिरकीपटूंची जादू चालेल. मैदान मोठे असल्याने गोलंदाज न घाबरता गोलंदाजी करु शकतील.

पाऊस आला तर काय होईल?

पावसामुळे रविवारी सामना पूर्ण झाला नाही, तर सोमवारी राखीव दिवशी सामना पूर्ण होईल. दोन दिवसांनंतरही सामना रद्द झाल्यास आयसीसीचा नियम आहे. 2019 प्रमाणे यावेळीही सीमा मोजणीचा नियम नाही. तो नियम रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर असलेल्या संघ विजयी होईल. अर्थातच याचा फायदा टीम इंडियाला होईल. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Marathi Movie: 'वाढलेलं वय अन् लग्नाची जुळवणी', सुबोध भावे अन् तेजश्रीनं घातला घाट; ट्रेलरने उत्सुकता वाढवली

MNS Manifesto: आम्ही हे करु! गडकिल्ले, रोजगार ते महिलांची सुरक्षा, मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध!

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

SCROLL FOR NEXT