virat kohli twitter
Sports

Virat Kohli,IND vs AUS: कोहलीच्या फॉर्मची कसोटी! 14 वर्षांत प्रथमच ऑस्ट्रेलियात असं घडलं

Virat Kohli Performance In IND vs AUS Test Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत विराट कोहलीची बॅट शांतच राहिली. दरम्यान कसा राहिला रेकॉर्ड? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना सिडनीच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

यासह भारतीय संघाने ही मालिका ३-१ ने गमावली आहे. या संपूर्ण मालिकेत विराच कोहलीचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. पर्थ कसोटीतील शतकी खेळी सोडली, तर त्याला एकही मोठी खेळी करता आली नाही. हा विराटच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा ऑस्ट्रेलिया ठरला. यापू्र्वी तो जेव्हा जेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलाय, तेव्हा विराटने इतकी निराशाजनक कामगिरी कधीच केली नव्हती.

५ सामन्यांमध्ये अवघ्या १९० धावा (Virat kohli in ind vs aus test series)

सिडनीच्या मैदानावर विराट कोहली ऑस्ट्रेलियातील आपला शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. दुसऱ्या डावात तो अवघ्या ६ धावा करत तंबूत परतला. दोन्ही डावात मिळून त्याला अवघ्या २३ धावा करता आल्या. तर संपूर्ण मालिकेतील ५ सामन्यांतील ९ डावात अवघ्या १९० धावा केल्या. यादरम्यान त्याला केवळ १ शतकी खेळी करता आली.य

विराटने यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळताना २०१८ मध्ये १ शतक आणि १ अर्धशतक झळकावलं होतं. २०११-१२ मध्ये पासून ते २०२०-२१ पर्यंत त्याने १३ सामन्यांमध्ये ५४.०८ च्या सरासरीने १३५२ धावा केल्या.

आतापर्यंत त्याच्या बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत दमदार रेकॉर्ड राहिला होता. मात्र २०२४-२५ चा ऑस्ट्रेलिया दौरा हा त्याच्यासाठी वाईट स्वप्नापेक्षा कमी राहिलेला नाही. या मालिकेतील सर्वच डावात तो ऑफ साईडच्या बाहेर जाणारे चेंडू खेळताना बाद झाला आहे.

त्याची या मालिकेतील कामगिरी पाहिली, तर त्याला अवघ्या १९० धावा करता आल्या आहेत. विराट इथून पुढे कसोटी क्रिकेट खेळणार की निवृत्ती घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

Budh Gochar: 12 महिन्यांनी बुध करणार गुरुच्या राशीत प्रवेश; 'या' राशींच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा

SCROLL FOR NEXT