jasprit bumrah twitter
Sports

Jasprit Bumrah Statement: 'वाईट तर वाटतंय..', मालिका हातून गेल्यानंतर जसप्रीत बुमराह भावुक, म्हणाला..

Jasprit Bumrah Emotional Statement: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर जसप्रीत बुमराह भावुक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

बॉर्डर गावसकर मालिकेतील शेवटचा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर जिंकण्यासाठी १६१ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून शानदार विजय मिळवला.

यासह ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-१ ने आपल्या नावावर केली. भारतीय संघाने १ दशकानंतर बॉर्डर गावसकर मालिका गमावली. दरम्यान या पराभवानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहने पराभवाचं नेमकं कारण सांगितलं आहे.

काय म्हणाला जसप्रीत बुमराह?

या पराभवानंतर बोलताना जसप्रीत बुमराह म्हणाला की, ' थोडं वाईट वाटतंय, पण कधीकधी तुम्हाला तुमच्या शरीरालाही आदर द्यावा लागतो. तुम्ही तुमच्या शरीराशी लढू शकत नाही. पहिल्या डावातील दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करताना मला वेदना जाणवल्या. संघातील इतर गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. संघातील एक गोलंदाज कमी झाल्यानंतर दुसऱ्या गोलंदाजाला जबाबदारी घ्यावी लागली.

तसेच तो पुढे म्हणाला, ' .या संपूर्ण मालिकेत जोरदार लढत पाहायला मिळालं. आम्ही आजही सामन्यात होतो, सामना आमच्या हातात होता. मात्र हे कसोटी क्रिकेट आहे. शेवटपर्यंत सामन्यात टिकून राहणं, दबाव टाकणं, दबाव सहन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आम्हाला परिस्थितीनुसार खेळावं लागेल. हा आमच्यासाठी मोठा धडा आहे.'

बुमराहने पटकावला प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार

या संपूर्ण मालिकेत जसप्रीत बुमराह चमकला. त्याने संपूर्ण मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं. या मालिकेत गोलंदाजी करताना त्याने सर्नाधिक ३२ गडी बाद केले. या दमदार कामगिरीच्या बळावर त्याची प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून निवड करण्यात आली.

मालिकेतील शेवटच्या सामन्यातील पहिल्या डावातही त्याने दमदार गोलंदाजी केली आणि २ गडी बाद केले. त्याने संघाला दमदार सुरुवात करुन दिली होती. मात्र दुसऱ्या डावात तो दुखापतग्रस्त असल्यामुळे गोलंदाजी करण्यासाठी येऊ शकला नाही. याचा भारतीय संघाला चांगलाच फटका बसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Skin Care Routine: काय आहे पंतप्रधानाचं Skin Care Routine? हरलीन देओलने प्रश्न विचारताच मोदींचं भन्नाट उत्तर

Actor Death: KGF सुपरस्टारचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी; सिनेसृष्टीवर शोककळा

Maharashtra Municipal Corporation Election : महापालिका निवडणुका कधी होणार? एकनाथ शिंदेंच्या नेत्याने थेट तारखा सांगितल्या

Stressful Situation : भरपूर ताण येतो अन् डोके दुखते, मग आजपासूनच करा 'या' गोष्टी

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; ऐन निवडणुकीत बड्या नेत्याने साथ सोडली, 'घड्याळ' हाती बांधलं

SCROLL FOR NEXT