बॉर्डर- गावसकर मालिका समाप्त झाली आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियाने ३-१ ने खिशात घातली आहे. मात्र या मालिकेसह काही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे,विराट कोहली आणि रोहित शर्मा कसोटी क्रिकेटला रामराम करणार का? मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्यातून कर्णधार रोहित शर्माला वगळण्यात आलं.
यावरुन रोहित निवृत्त होणार असल्याच्या चर्चांना आणखी हवा मिळाली. तर दुसरीकडे विराट कोहली देखील आऊट ऑफ फॉर्म असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान या सामन्यानंतर हेड कोच गौतम गंभीरने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधील भविष्याबाबत भाष्य केलं आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना गौतम गंभीर म्हणाला, ' मी कुठल्याही खेळाडूच्या भविष्याबाबत भाष्य करु शकत नाही. हे सर्व त्या खेळाडूवर अवलंबून आहे. मी इतकंच म्हणेल, की त्याच्यात अजूनही धावा करण्याची भूख आहे. आशा करतो की, अशीच कामगिरी तो यापुढेही सुरु ठेवेल. तो जो काही निर्णय घेईल, तो सर्वश्रेष्ठ असेल.'
रोहितने या कसोटीत विश्रांती करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाबाबत बोलताना गंभीर म्हणाला, ' जेव्हा एक कर्णधार किंवा एक लीडर संघाचा विचार करुन एखादा निर्णय घेत असेल, तर यात वाईट काहीच नाही. त्याच्याबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या. संघ हा सर्वात महत्वाचा आहे आणि देश त्याहूनही जास्त महत्वाचा आहे.'
विराट कोहली या दशकातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. वनडे, कसोटी आणि टी-२० क्रिकेटमध्येही त्याचा शानदार रेकॉर्ड राहिला आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकपची फायनल झाल्यानंतर त्याने टी-२० क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता.
त्याच्या कसोटी क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १२२ कसोटी सामन्यांमध्ये ९२०७ धावा केल्या. यादरम्यान त्याने ३० शतकं आणि ३१ अर्धशतकं झळकावली. नाबाद २५४ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
विराटच्या वनडे क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने २९५ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १३९०६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या नावे ५० शतक आणि ७२ अर्धशतक झळकावण्याची नोंद आहे.
तर टी-२० क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १२५ सामने खेळले. यादरम्यान त्याला ४१८८ धावा करता आल्या. यादरम्यान त्याने १ शतक आणि ३८ अर्धशतकं झळकावली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.